आता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे
Pravin Dabholkar
| Dec 16, 2023, 08:56 AM IST
IPL 2024 Rohit Sharma : कॅप्टन्सीच्या पहिल्याच सिझनमध्ये रोहित शर्माने आपल्या चमत्कार दाखवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून त्याने आपल्या संघासाठी विजेतेपद पटकावले
1/10
आता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
![आता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680998-ipl-rohit-sharma7.png)
Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माला बाजुला करत हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सर्वजण रोहित शर्माच्या सपोर्टसाठी सोशल मीडियात उतरले आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला केवळ 5 ट्रॉफीच दिल्या नाहीत तर अनेक गोष्टी केल्या आहेत. रोहित शर्माच्या फॅन्सना या गोष्टी माहिती असायला हव्यात.
2/10
आयपीएल ट्रॉफी दूरच
![आयपीएल ट्रॉफी दूरच IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680997-ipl-rohit-sharma10.png)
आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स हा करोडो चाहत्यांचा आवडता संघ होता. कारण होतं- सचिन तेंडुलकर. सुरुवातीच्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये सनथ जयसूर्यासह हरभजन सिंग, लसिथ मलिंगा, शॉन पोलॉक, झहीर खान यासारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. लवकरच किरॉन पोलार्डही त्यात सामील झाला. फ्रँचायझीने कर्णधारानंतर कर्णधार बदलला पण आयपीएल ट्रॉफी त्यांच्यापासून दूरच राहिली.
3/10
मुंबई इंडियन्स वेगळ्या उंचीवर
![मुंबई इंडियन्स वेगळ्या उंचीवर IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680995-ipl-rohit-sharma9.png)
2013 मध्ये महान रिकी पाँटिंगला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण त्याची बॅट चालली नाही आणि त्याला कर्णधारपद सोडावे लागले. त्यानंतर मोसमाच्या मध्यात रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली. त्यावेळी 25 वर्षीय रोहितचे टीम इंडियातील स्थानही निश्चित झाले नव्हते. पण आपल्या मेहनतीने आणि नियोजनाने रोहितने मुंबई फ्रँचायझीला एका वेगळ्या उंचीवर नेले.
4/10
पहिल्याच सिझनमध्ये चॅम्पियन
![पहिल्याच सिझनमध्ये चॅम्पियन IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680994-ipl-rohit-sharma8.png)
कॅप्टन्सीच्या पहिल्याच सिझनमध्ये रोहित शर्माने आपल्या चमत्कार दाखवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून त्याने आपल्या संघासाठी विजेतेपद पटकावले. जे सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगसारखे कर्णधार पहिल्या 5 सीझनमध्ये करू शकले नाहीत, ते रोहितने त्याच्या पहिल्या सीझनमध्येच करून दाखवले.
5/10
5 आयपीएल विजेतेपद
![5 आयपीएल विजेतेपद IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680993-ipl-rohit-sharma7.png)
6/10
शर्माचे महत्त्वाचे योगदान
![शर्माचे महत्त्वाचे योगदान IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680992-ipl-rohit-sharma6.png)
रोहित शर्मा हा खेळाडूंचा कर्णधार म्हणून ओळखला जातो. तो प्रत्येक खेळाडूशी बोलतो. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मुंबई इंडियन्सने भारतीय संघाला अनेक खेळाडू दिले आहेत, यामध्ये रोहित शर्माचे महत्त्वाचे योगदान होते. आता कर्णधार बनलेल्या हार्दिक पांड्याने रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले. रोहितच्या नेतृत्वाखाली क्रुणाल पांड्याही चमकला. जसप्रीत बुमराहनेही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
7/10
खेळाडूंना ओळख
![खेळाडूंना ओळख IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680991-ipl-rohit-sharma5.png)
8/10
एका धावेने अंतिम सामना जिंकण्याची ताकद
![एका धावेने अंतिम सामना जिंकण्याची ताकद IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680990-ipl-rohit-sharma4.png)
9/10
चेन्नईचा चारही सामन्यांमध्ये पराभव
![चेन्नईचा चारही सामन्यांमध्ये पराभव IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680989-ipl-rohit-sharma3.png)
महेंद्रसिंग धोनीची कर्णधार क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे. रोहित शर्माने आयपीएल फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा तीनदा पराभव केला. पुणे राजस्थान रॉयल्सने सुपर जायंट्सचा पराभव केल्यावर धोनीही त्या संघाचा एक भाग होता. आयपीएल 2019 मध्ये मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा चारही सामन्यांमध्ये पराभव केला.
10/10
अशक्य परिस्थितीतून विजय
![अशक्य परिस्थितीतून विजय IPL 2024 Rohit Sharma do for Mumbai Indians After Hardik Pandya Captancy Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/16/680986-ipl-rohit-sharma2.png)