धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना IRCTC चे गिफ्ट, मोठ्या सवलतीत मिळतेय टूर पॅकेज

वैष्णोदेवीच्या दर्शनासोबत भारताच्या उत्तर भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी आयआरसीटीसीने गिफ्ट दिलंय. IRCTC ने एक नवीन टूर पॅकेज आणले आहे. 

| Jul 28, 2023, 12:38 PM IST

IRCTC Tour Package: वैष्णोदेवीच्या दर्शनासोबत भारताच्या उत्तर भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी आयआरसीटीसीने गिफ्ट दिलंय. IRCTC ने एक नवीन टूर पॅकेज आणले आहे. 

1/9

धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना IRCTC चे गिफ्ट, मोठ्या सवलतीत मिळतेय टूर पॅकेज

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

IRCTC Tour Package: वैष्णोदेवीच्या दर्शनासोबत भारताच्या उत्तर भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी आयआरसीटीसीने गिफ्ट दिलंय. IRCTC ने एक नवीन टूर पॅकेज आणले आहे. 

2/9

10 रात्री आणि 11 दिवस

 IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

हे पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी आहे. 11 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणाऱ्या पॅकेजमध्ये, माता वैष्णोदेवीला भेट देण्याव्यतिरिक्त, तुम्ही हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, मथुरा, वृंदावन, आग्रा आणि अयोध्यालाही भेट देता येणार आहे.

3/9

भारत गौरव टुरिझम रेल्व मार्ग

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

या सर्व शहरांमध्ये तुम्हाला प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि इतर ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतील. या शहरांतील लोकांना भेटून त्यांची संस्कृती जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही उत्तर भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देऊ शकाल. 

4/9

IRCTC वेबसाइटवर माहिती

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

हे पॅकेज तुम्हाला भारताचा इतिहास, संस्कृती आणि धर्माला नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी देईल. या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

5/9

11 दिवसांचा प्रवास

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

भारत गौरव पर्यटन ट्रेन 11 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल आणि 21 ऑगस्ट 2023 पर्यंत धावेल. कोलकाता रेल्वे स्थानकावरून सुरू होणारी भारत गौरव पर्यटन ट्रेन कोलकाता, मेचेदा, खरगपूर, झारग्राम, टाटानगर, राउरकेला, रांची, बोकारो स्टील सिटी, धनबाद, हजारीबाग रोड, कोडरमा, गया, सासाराम आणि दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे थांबेल.

6/9

भाडे किती?

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

भारत गौरव टुरिझम ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रति व्यक्ती 17 हजार 700 रुपये आणि स्टँडर्ड क्लाससाठी प्रति व्यक्ती 27 हजार 400 रुपये. कंफर्ट क्लासचे भाडे प्रति व्यक्ती 30 हजार 300 रुपये असेल. 

7/9

देशांतर्गत पर्यटनाला चालना

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

एक भारत श्रेष्ठ भारत आणि देखो अपना देश योजनेअंतर्गत देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ट्रेन चालवली जात आहे. IRCTC भारत गौरव ट्रेन योजनेअंतर्गत रेल्वे पर्यटनाला चालना देण्यासाठी 33 टक्के सवलत देत आहे.

8/9

टूर पॅकेज

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

या पॅकेजमध्ये तुम्हाला जेवण, प्रवास विमा, टूर मॅनेजरची उपस्थिती, टूर पॅकेजमध्ये निवास अशा सर्व प्रवासी सुविधा मिळतात. तुम्ही IRCTC वेबसाइट www.irctctourism.com वर जाऊन तिकीट बुक करू शकता. 

9/9

तिकीट बुकींग

IRCTC Tour Package for Devotees visiting religious places from Indian Railway

या दरम्यान, तुम्हाला काही समस्या आल्यास, तुम्ही 8595904082 किंवा 8595904077 वर डायल करून तिकीट बुक करू शकता. रेल्वे गाडी सुटण्याच्या आठवडाभर आधी आसनव्यवस्था निश्चित केली जाईल.