Jaggery Milk : कोमट दूधासोबत गुळ मिसळणं योग्य की अयोग्य?
Jaggery : हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप येणे हे अनेकांना होतं असतं. त्यामुळे हिवाळ्यात आपण कोमट दूध, हळदीचं दूध घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण जर तुम्ही दूध आणि गुळ एकत्र घेतं असाल तर आधी ही बातमी वाचा.
Jaggery With Milk Benefits : हिवाळ्यात (winter) अचानक बदलेलं वातावरण आणि त्यात वाढलेली थंडी यामुळे अनेकांना सर्दी, खोकला सारखे आजारपण त्रास देतात. त्यात राज्यात गोवरने (Measles) थैमान घातलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ लोकांना पौष्टिक खाणेपिणे, काढा, जास्त प्रमाणात पालेभाज्या आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. लोक आजकाल आपल्या आरोग्याबद्दल खूप जागृत झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातून साखरेला हद्दपार केलं आहे. गुळाचा चहा (Jaggery tea), गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर वाढला आहे. अनेक जण कोमट दुधासोबत गुळ असंही घेतात. दूध आणि गूळ हे चांगले कॉम्बिनेश मानलं जातं. त्यामुळे अनेक जण दूध आणि गूळ एकत्र घेतात. पण काही लोकांनी कोमट दूध आणि गूळ एकत्र घेणे त्यांचा आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर काही लोकांसाठी कोमट दूध आणि गुळ हे वरदान ठरतं. (jaggery with warm milk Is it right or wrong health tips)