पैसे आहे म्हणून काय पण? 12 लाख रुपये खर्चून माणसाचा कुत्रा बनला
अनेकांना प्राणी आवडतात. मात्र, कुणीही प्राण्याप्रमाणे वागत नाही किंवा कुणीही प्रत्यक्षात प्राणी बनावं असा विचारही करत नाही. मात्र, जपानमधील एक व्यक्ती माणसाचा कुत्रा बनला आहे.
Japanese Man Transforms Into Dog : पैसै आला की खरचं माणसाचं डोकं फिरत का? असा प्रश्न उपस्थित करणारे विचित्र कृत्य जपानमधील एका व्यक्तीने केले आहे. तब्बल 12 लाख रुपये खर्चून हा व्यक्ती माणसाचा कुत्रा झाला आहे. माणसाचा प्राणी झाल्याचा हा जगातील पहिलाच अजब प्रकार असावा. हा माणूस आता कुत्र्यासारखा दिसतो आणि कुत्र्यासारखाच वागतोय. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

