सचिनचा रेकॉर्ड मोडीत निघण्याच्या 'रुट'वर, टेस्ट क्रिकेटचे सर्वाधिक शतकवीर कोण?

Most hundreds in a career in Tests : इंग्लंडचा स्टार क्रिकेट जो रूट सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. पण तुम्हाला माहितीये का? टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर आहेत?

| Sep 01, 2024, 16:16 PM IST
1/7

जो रुटने रचला इतिहास

जो रुटने इंग्लंडचा माजी कॅप्टन अॅलेस्टर कुकचा रेकॉर्ड मोडीस काढला अन् सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 

2/7

सचिन तेंडूलकर

सचिन तेंडूलकरने 200 सामन्यात 51 शतकं ठोकले आहेत. यामध्ये सचिनने 15921 धावा केल्या आहेत.

3/7

जॅक कॅलिस

साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज जॅक कॅलिस याने 166 सामन्यात 45 शतकं ठोकली आहेत. यादरम्यान त्याने 13289 धावा नावावर केल्या.

4/7

रिकी पॉटिंग

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पॉटिंग 168 सामने खेळले अन् 13378 धावा कोरल्या. यादरम्यान त्याने 41 शतकं नावावर केली आहेत.

5/7

कुमार संगाकारा

श्रीलंकेचा स्टार माजी कॅप्टन कुमार संगाकारा याने 134 सामन्यात 38 शतकं केली असून 12400 धावा केल्या आहेत.

6/7

राहुल द्रविड

टीम इंडियाचा द वॉल म्हणजे राहुल द्रविड याने 164 सामन्यात 36 शतकं नावावर केली आहेत. यामध्ये त्याने 13288 धावा कोरल्या आहेत.

7/7

जो रुट

जर जो रुट याने आत्तापर्यंत 145 सामन्यातील 34 शतकांसह 12377 धावा केल्या आहेत. सध्या खेळणाऱ्या क्रिकेट्समध्ये तो अव्वल स्थानी आहे.