July 2024 Numerology : 'या' मूलांकांच्या लोकांसाठी मोठं यश! जुलै महिन्यात तुमच्या नशिबात काय?
July 2024 Ank jyotish : जुलै महिना हा अंकशास्त्रानुसार काही मूलांकासाठी वरदान तर काहींसाठी संकटांचा ठरणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी जुलै महिना काय घेऊन आलाय जाणून घ्या.
नेहा चौधरी
| Jun 30, 2024, 13:21 PM IST
1/9
मूलांक 1

जुलै महिना या मूलांकच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि मान सन्मान वाढणार आहे. आर्थिक बाबतही जुलै महिना तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहेत. मात्र प्रेमसंबंधांमध्ये मन अस्वस्थ राहणार आहे. तुम्ही या काळात कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
2/9
मूलांक 2

जुलै महिना तुमच्यासाठी शुभ असून कार्यक्षेत्रात तुमच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनात बदल दिसून येणार आहेत. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार असून रचनात्मक कार्यातून शुभ परिणाम मिळणार आहेत. न्यायालयीन प्रकरणांमध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुने अडकलेले पैसेही कुठूनतरी परत मिळणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष वाढणार आहे. जुलैअखेर चर्चेतून परिस्थिती निवळल्यास बरं होईल.
3/9
मूलांक 3

जुलै महिना तुमच्यासाठी कठीण असणार आहे. जुलै महिन्यात तुमच्यासाठी त्रास वाढणारा ठरणार आहे. या परिस्थितीमुळे काही त्रास वाढणार आहेत. आर्थिक बाबतीत भागीदारीत केलेली गुंतवणूक अडचणी आणण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधातील कोणत्याही बातमीने तुम्ही दु:खी होणार आहात. जुलैच्या शेवटी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेच असणार आहे.
4/9
मूलांक 4

जुलैमध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचे फायदेही मिळणार आहेत. मन चंचल राहणार असून कामाच्या ठिकाणी काही बदलाबाबत द्विधा मनस्थिती असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी शुभ परिणाम दिसून येईल. या महिन्याच्या शेवटी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल मन अस्वस्थ असेल. तर आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येईल.
5/9
मूलांक 5

6/9
मूलांक 6

जुलै महिन्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रेम जीवनात आनंद येणार आहे. आर्थिक बाबतीत काळ हळूहळू अनुकूल होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस चर्चेद्वारे प्रकरणे सोडवल्यास तुम्हाला फायदा होईल.
7/9
मूलांक 7

जुलै महिना आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रेम संबंधात अस्वस्थता जाणवणार असून तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंददायी अनुभव घेणार आहात. तुम्ही तुमचे निर्णय नैतिक आधारावरच घेतल्यास फायदेशीर ठरेल. जुलैच्या शेवटी वेळ अनुकूल असून जुलैच्या शेवटी तुम्ही खूप व्यस्त असणार आहात.
8/9
मूलांक 8

जुलै महिन्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. मन प्रसन्न असणार आहे. जुलै महिन्यात सुरू झालेला कोणताही प्रकल्प तुमच्यासाठी शुभ असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत करणार ठरणार आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडणार आहे.
9/9
मूलांक 9
