न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

Mar 07, 2020, 08:54 AM IST
1/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश मुरलीधर यांचा निरोपसमारंभ गुरुवारी पार पडला.

2/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

दिल्लीतील हिंसाचारासाठी कारणीभूत असणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयातील आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. 

3/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

दिल्ली हिंसाचारानंतर भाजप नेत्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर न्यायमूर्ती मुरलधीर प्रचंड चर्चेत आले होते. या आदेशानंतर त्यांची तात्काळ बदली झाल्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले.

4/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

न्यायमूर्ती मुरलीधर यांनी विनातक्रार बदलीचा आदेश मान्य केला. यानंतर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी सहकारी न्यायाधीश आणि वकिलांनी एकच गर्दी केली होती. 

5/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

न्यायमूर्ती मुरलीधर यांना निरोप देण्यासाठी उच्च न्यायालयात झालेल्या या गर्दीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

6/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

आपल्या निरोप समारंभावेळी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला. न्यायाचा विजय आवश्यक असतो, तेव्हा तो विजयी होतोच. नेहमी सत्याच्या बाजूने राहा, न्याय जरुर मिळेल, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. यावेळी इमारतीच्या मजल्यावर आणि पायऱ्यांवर सर्व वकील दाटीवाटीने उभे होते. 

7/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

यानंतर न्यायमूर्ती मुरलीधर लगेचच चंदीगढला रवाना झाले. यावेळी चंदीगढ रेल्वे स्थानकावरही त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

8/8

न्या. मुरलीधर यांच्या निरोपासाठी सहकाऱ्यांची गर्दी

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदर असा कमवायचा असतो, अशा प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहेत.