महाराष्ट्रातील केदारनाथ! घनदाट जंगलात,छुप्या गुहेत एका खांबावर उभे असलेले रहस्यमयी मंदिर; जगाच्या विनाशाचे संकेत देणार
मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर रहस्यमयी केदारेश्वर गुहा मंदिर आहे.
Kedareshwar Cave Temple, Harishchandragad Fort in the Ahmednagar : महाराष्ट्रात देखील उत्तराखंडमधील केदारनाथ सारखे एक रहस्यमयी शिव मंदिर आहे. केदारेश्वर गुहा मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. हरिश्चंद्रगडावरील हे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे. या गुहेत कमरे इतके पाणी असून पाण्यात शिवलिंग आहे. पाणी अतिशय थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहचणे अत्यंत कठीण आहे. पावसाळ्यात प्रचंड वेगाने पाणी वाहते यामुळे गुहेपर्यंत पोचणे अशक्य असते.