'माझं लग्न आधीच झालंय...' एका वाक्यामुळं चर्चेत आली होती केतकी माटेगावकर

केतकी माटेगावर आज तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का अभिनेत्री आणि गायिका केतकीने आधीच लग्न केलं आहे? होय स्वत: केतकीनेच याबाबत खुलासा केला होता.  हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. जाणून घेवूयात केतकीच्या या वक्तव्याबद्दल...

Feb 21, 2024, 19:42 PM IST

मुंबई : केतकी माटेगावर आज तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का अभिनेत्री आणि गायिका केतकीने आधीच लग्न केलं आहे? होय स्वत: केतकीनेच याबाबत खुलासा केला होता.  हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. जाणून घेवूयात केतकीच्या या वक्तव्याबद्दल...

 

1/7

केतकी माटेगावर साजरा करतेय वाढदिवस

आज अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावर आज तिचा ३० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.   

2/7

काही दिवसापुर्वी दिलेल्या मुलाखतीत केतकीने तिच्या लग्नाविषयी एक वक्तव्य केलं होतं.

3/7

'माझं लग्न झालं आहे.'

एका मुलाखतीत तिला तु खऱ्या आयुष्यात कधी लग्न करतेयस असं विचारण्यात आलं होतं. यावर केतकी म्हणाली, 'माझं लग्न झालं आहे. म्युझिकबरोबर.' 

4/7

पुढे केतकी म्हणाली, 'माझ्या आजीने मला एकेदिवशी अगदी भंडावून सोडलं होते. लग्न कर, लग्न कर.'

5/7

'मी तिला टॅटू दाखवला'

आजीला केतकी म्हणाली की, मी तिला माझ्या बोटावर असलेला टॅटू दाखवला आणि म्हणाले की, मी म्युझिकसोबत लग्न केलं आहे.' 

6/7

'माझं दुसरं लग्न असेल'

पुढे केतकी म्हणाली,  'आता जो कुणी माझ्या आयुष्यात येईल ते माझं दुसरं लग्न असेल. असंही केतकी म्हणाली.'

7/7

'माझा पहिला नवरा म्युझिक'

पुढे केतकी म्हणाली,  'माझा पहिला नवरा हे माझं म्युझिक आहे. त्यामुळे काहीही झालं तरी दुसऱ्या नवऱ्याला त्याच्याशी जमवून घ्यावं लागेल., असे केतकीने मुलाखतीत सांगितले.'