उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची उत्तराधिकारी होणार 11 वर्षांची मुलगी? गुप्तचर संस्थेकडून खुलासा

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या 11 वर्षांच्या मुलीसह दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. त्यानंतर गुप्तचर संस्थेकडून खुलासा करण्यात आलाय की, - उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची उत्तराधिकारी ही 11 वर्षांची मुलगी होणार अशी सूत्रांची माहितीय. 

नेहा चौधरी | Jul 30, 2024, 10:14 AM IST
1/10

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने खासदारांना सांगितलं की उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्या 11 वर्षीय मुलीला देश चालवण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. जू-ए हे 1940 पासून देशावर राज्य करणाऱ्या किम कुटुंबाचे पुढील पिढीतील वारस आहेत. 

2/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासदारांनी सांगितले की नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने त्यांना सोमवारी बंद दरवाजाच्या बैठकीत ही माहिती दिली. एनआयएसने खासदारांना असेही सांगितलंय की किम जोंग-उन आता अत्यंत लठ्ठ असून त्याचे वजन सुमारे 140 किलोग्रॅम आहे. त्यामुळे ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

3/10

अनेक प्रसंगी वडिलांसोबत दिसल्यानंतर आता किम जू ए तिच्या वडिलांची उत्तराधिकारी होणार की नाही या चर्चेला जोर आलाय. किम जू ए यावेळी पूर्वीपेक्षा जास्त मॅच्युअर दिसायला लागली आहे.

4/10

उत्तर कोरियाच्या लष्कराच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त या परेडचे आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये मोठ्या संख्येने सैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. परेडपूर्वी किम जू ए डिनरमध्ये सहभागी झाले होते. 

5/10

उत्तर कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला किम जू ए हिला 'प्रिय मुलगी' असं संबोधलं होतं. मात्र लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या मेजवानीनंतर तिला 'सन्मानित मुलगी' असं संबोधण्यात आलं.

6/10

उत्तर कोरियावर किम कुटुंबाच्या तीन पिढ्यांचं राज्य आहे. तिथे या घराण्याचं वर्चस्व असून अशा स्थितीत किम जोंग यांना उत्तर कोरियाची गादी त्यांच्या चौथ्या पिढीकडे सोपवायची आहे.

7/10

किम जू एच्या सार्वजनिक ठिकाणी वारंवार हजेरी लावल्यानंतर, ती उत्तर कोरियाची पुढील उत्तराधिकारी आहे की नाही याबद्दल अटकळ सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत एवढ्या कमी वयात किम जू ए यांना आपला उत्तराधिकारी बनवण्याची घाई का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

8/10

असे सांगण्यात आलंय की, किम-जोंग-उन केवळ 8 वर्षांचे होते, तेव्हाच ते उत्तर कोरियाचे उत्तराधिकारी बनणार हे निश्चित झालं होतं. अशा स्थितीत उत्तर कोरियाचे तज्ज्ञ किम जू ए यांचा उत्तराधिकारी होण्याचा अंदाजही लावत आहेत.

9/10

दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थेने तिचे वय सुमारे 11 वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. किम आणि त्याची पत्नी री सोल जू यांच्या तीन मुलांपैकी ती दुसरी नंबरची मुलगी आहे. 

10/10

सध्या सोशल मीडियावर किम जू एचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ती देशाची पुढची वारसदार असण्याची शक्यता लोक व्यक्त करत आहेत.