वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक
King Charles III Coronation: आज 6 मे 2023 रोजी इंग्लंडमध्ये शाही राज्याभिषेक सोहळा (King Charles Crowned) पार पडला आहे. संपुर्ण कुटुंबियांच्या समक्ष प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमेला इंग्लंड राजा-राणी झाले आहेत. त्यांच्या या सोहळ्याला जागातिक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
King Charles III Coronation: मागील वर्षी राणी एलिझाबेन (Queen Elizabeth) यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या राजघरण्याचा पुढला वारस कोण तर अर्थातच नावं होतं प्रिन्स चार्ल्स यांचे. प्रिन्स चार्ल्स हे कर्तृत्ववान, देखणे आणि रूबाबदार तर आहेत परंतु त्याचसोबत ते लोकप्रिय आहेत. यावर्षी त्यांच्या राज्याभिषेकाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्यांचा राज्याभिषेक सोहळा (King Charles III Crown Ceremony) संपन्न झाला असून या सोहळ्या जगातील नामवंत पाहुण्याची हजेरी लागली होती. आज 6 मे 2023 रोजी प्रिन्स चार्ल्स हे किंग चार्ल्स तिसरे झाले आहेत.