Lal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?

अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)

Jan 02, 2023, 14:01 PM IST

Lal Kitab ke Totke : अनेकदा बरेच प्रयत्न करुनही काही व्यक्तींच्या वाट्याला श्रीमंती, आदर, यश काही येत नाही. अशा वेळी आपण असह्य आहोत, काहीच वाटा गवसत नाहीयेत, आपल्याला कोणीही मदत करत नाहीये असंच वाटतं. अशा वेळी नशीब, ग्रहतारे, रास हे सारे उपाय करण्यासाठी आपण पुढे सरसावतो. शक्य ते सर्व प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये का? यावरचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness )

1/5

Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness

'लाल किताब' अशा शब्दांत या चमत्कारिक पुस्तकाचा उल्लेख केला जातो. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आर्थिक चणचण भासत असल्यास व्यक्तीनं हनुमान चालिसेचं पठण करावं. मंगळवारी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन तिथं लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. 

2/5

Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness

रोज पक्ष्यांना खायला घाला. असं केल्यास नकळत तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील. धर्म- शास्त्रामध्ये हे अतिशय शुभसूचक काम मानलं जातं. 

3/5

Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness

संकटं, आजारपण, अडथळे संपत नसल्यास तुम्ही घरातील कोणत्याही वाटीमध्ये तेल घेऊन ते शनिमंदिरात अर्पण करा. यासाठी कांस्याची वाटी वापरल्यास त्याचे परिणाम वेगानं दिसतील.   

4/5

Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness

गायीला दररोज चारा, चपाती- गुळ खायला घातल्यास याचाही फायदा होतो. घरात सुख- शांती नांदते

5/5

Lal Kitab Totke Upay how to get financial benefits and happiness

घरात फक्त शोभा वाढवण्यासाठी नव्हे, तर सकारात्मक परिणामांच्या अपेक्षेनंही Fish Tank ठेवला जातो. घरात फिश टँक असल्यास त्यामघ्ये 5  गोल्ड फिश आणि 1 ते 2 काळे मासे त्यात ठेवा. असं केल्यास तुमच्या घरातील संकट हे मासे त्यांच्यावर घेतात असं म्हटलं जातं. टँकमधील एखादा मासा मृत झाल्यास तो लगेचच काढून टाका आणि पुन्हा त्या रंगाचा मासा टँकमध्ये ठेवू नका.  (वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)