RBI ची Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली

Loans Against Gold Jewellery: देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही थक्क करणारी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे आरबीआयने आणि सोनं गहाण ठेवून भारतीयांनी किती कर्ज घेतलं आहे पाहूयात...  

| Dec 02, 2024, 11:05 AM IST
1/8

goldloan

भारतीयांच्या कर्ज घेण्याच्या पॅटर्नसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आकडेवारी जारी केली असून यामध्ये सोन्यासंदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे.

2/8

goldloan

सोने गहाण ठेऊन त्याच्या मोबदल्यात कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. 2024-25 च्या आर्थिक वर्षातील यासंदर्भातील आकडेवारी फारच थक्क करणारी आहे.   

3/8

goldloan

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात बँकांमध्ये सोने आणि घरातील दागदागिन्याच्या मोबदल्यात घेतल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण 50.4 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे.  

4/8

goldloan

भारतातील बँकांच्या क्षेत्रनिहाय कर्जवितरणाची आकडेवारी शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली. यातूनच भारतामध्ये सोनं तारण ठेवणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसूं आलं आहे.  

5/8

goldloan

आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये दिसून आलं आहे. 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत सोन्यावरील कर्जाची थकबाकी 154282 कोटी रुपये इतकी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हीच थकबाकी 102562 कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच वार्षिक आधारे या थकबाकीचा विचार केला तर मागील सात महिन्यात झालेली वाढ ही 50.4 टक्के इतकी आहे.  

6/8

goldloan

सोने गहाण ठेऊन कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढण्यामागे दोन प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सोनेतारण ठेऊन कर्ज घेण्याची प्रक्रिया ही सामान्य कर्जाच्या प्रक्रियेपेक्षा अधिक सुलभ असते तसेच त्यावरील व्याजही तुलनेत कमी असल्याने कर्जदार हा पर्याय निवडण्यास प्राधान्य देताना दिसतात.

7/8

goldloan

सोने गहाण ठेऊन कर्ज घेण्यामागील एक प्रमुख कारण हे कर्जाविषय सुरक्षेचे आहे. बिगर बँक वित्तीय संस्थांनी असुरक्षित कजपिक्षा सोन्यावरील सुरक्षित कर्जाचे धोरण लोकांकडून स्वीकारले आहे, असं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत बिगर बँक वित्तीय संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये 0.7 टक्क्यांची घट झाली आहे.

8/8

goldloan

मागील काही आठवड्यांमध्ये सोन्याच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. यामुळे ग्राहकांना सोन्याच्या मोबदल्यात अधिक कर्ज सहजपणे मिळण्याचा पर्याय सोनेतारण ठेवण्याच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. त्यामुळेही सोनेतारण ठेऊन कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.