कानोसा उत्तर महाराष्ट्राचा : हे उमेदवार जिंकणार

२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.

May 21, 2019, 20:29 PM IST

२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी करणार असल्याचं चित्र पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रात भाजपला ५, शिवसेनेला २, काँग्रेसला १ जागा मिळेल तर राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी खातंही उघडणार नसल्याचा अंदाज आहे. 

1/8

कानोसा अहमदनगर मतदारसंघाचा

कानोसा अहमदनगर मतदारसंघाचा

यंदाच्या निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवरून जोरदार घमासान झालं. काँग्रेसकडून तिकिट मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही सुजय यांना उमेदवारी दिली. आता या जागेवर सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना पराभूत करू शकतात.   

2/8

कानोसा नाशिक मतदारसंघाचा

कानोसा नाशिक मतदारसंघाचा

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ आणि अपक्ष माणिकराव कोकाटेंना पराभूत करण्याचा अंदाज आहे.   

3/8

कानोसा दिंडोरी मतदारसंघाचा

कानोसा दिंडोरी मतदारसंघाचा

दिंडोरीमधून भाजपच्या भारती पवार राष्ट्रवादीच्या धनराज महाले आणि माकपच्या जे.पी.गावित यांना मात देण्याची शक्यता आहे.   

4/8

कानोसा जळगाव मतदारसंघाचा

कानोसा जळगाव मतदारसंघाचा

जळगावमध्ये भाजपचे उन्मेश पाटील राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव करतील, असा अंदाज वर्तवला जातो आहे.   

5/8

कानोसा रावेर मतदारसंघाचा

कानोसा रावेर मतदारसंघाचा

रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे या काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांच्यावर विजय मिळवू शकतात.   

6/8

कानोसा धुळे मतदारसंघाचा

कानोसा धुळे मतदारसंघाचा

धुळ्यामध्ये भाजपचे डॉ. सुभाष भामरे काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना हरवतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.   

7/8

कानोसा नंदुरबार मतदारसंघाचा

कानोसा नंदुरबार मतदारसंघाचा

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे के.सी.पडवी भाजपच्या हिना गावित यांना पराभवाचा धक्का देऊ शकतात.   

8/8

कानोसा शिर्डी मतदारसंघाचा

कानोसा शिर्डी मतदारसंघाचा

शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना धक्का देतील, असा अंदाज आहे.