लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.

| Apr 17, 2024, 20:59 PM IST
1/7

21 राज्यांतील 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. तामिळनाडूच्या सर्व 39 जागांव्यतिरिक्त राजस्थानच्या 12 आणि यूपीच्या 8 जागांवर मतदान होणार आहे. 

2/7

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाम आणि त्रिपुरात सभा घेतल्या. तर नजीबाबादमध्ये अखिलेश यादव आणि सहारनपूर मध्ये प्रियांका वाड्रा प्रचारात उतरल्या.

3/7

4/7

5/7

महाराष्ट्रात ज्या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाराय, त्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे...    

6/7

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

7/7

महाराष्ट्रातल्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.