हार्दिकच्या प्रेमात वेडी झाली, नेदरलँडची गोरी मेम भारतात आली... हिंदू पद्धतीने लग्न केलं, पाहा Photo

Love Story : एका औषध कंपनीत काम करताना उत्तर प्रदेशमध्ये राहाणाऱ्या हार्दिक वर्माची ओळख नेदरलँडच्या गॅबरीला डूडा हिच्याशी झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमाणत झालं आणि दोघांनी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहाण्याचा निर्णय घेतला. आता तीन वर्षांनी दोघांनी लग्न केलं.

Dec 01, 2023, 18:08 PM IST
1/5

उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये राहाणाऱ्या हार्दिक वर्मा या तरुणाने नेदरलँडच्या गॅबरीला डूडा हिच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. संपूर्ण राज्यात या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. लग्ना आधी दोघांनी हळदीची प्रथाही पार पाडली. तर लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी जोरदार डान्सही केला.

2/5

उत्तरप्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये राहाणारा हार्दिक वर्मा नोकरीनिमित्ताने नेदरलँडला गेला होता. एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून त्याला नोकरी लागली. तिथेच त्याची ओळख गॅबरीलाशी झाली.   

3/5

काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एकेदिवशी हार्दिक गॅबरीलाच्या घरी जाऊन आपलं प्रेम व्यक्त केलं. गॅबरीलानंही त्याच्या प्रेमाचा स्विकार केला. त्यानंतर तीन वर्ष दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिले. 

4/5

दोघांनी आपल्या घरी प्रेमाची माहिती दिली. विशेष म्हणजे दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर हार्दिक गॅबरीला हिला घेऊन फतेहपूरमधल्या आपल्या गावी पोहोचला. त्यानंतर वर्मा कुटुंबियांना मोठ्या धुमधडाक्यात दोघांचं लग्न लावून दिलं. 

5/5

हार्दिक आणि गॅबरिला यांच्या लग्नाची गोष्ट संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. गॅबरीलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.