चंद्रग्रहणाच्या वेळी झोपल्याने किंवा सेक्स केल्याने आरोग्य बिघडतं? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Lunar Eclipse 2023 : वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी दिसणार आहे. खगोल शास्त्राचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो का? याबाबतचे मिथ्य आणि फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.
Chandra Grahan 2023: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्र पाहणे सगळ्यांनाच आवडते. यावेळी चंद्रग्रहण आणि कोजागिरी हा योग 30 वर्षांनंतर जुळून आला आहे. शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की चंद्र आणि चांदण्यांचा समुद्रातील भरतीपासून ते आपल्या मानसिक आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पडतो. पण हीच गोष्ट चंद्रग्रहणालाही लागू होते का? चंद्रग्रहण दरम्यान झोपणे किंवा सेक्स केल्याने एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते का? चंद्रग्रहण 2023 शी संबंधित काही समज आणि तथ्ये जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य - iStock)