फोटो : 'महालक्ष्मी एक्सप्रेस'मध्ये प्रवासी अडकले, एनडीआरएफ-नौदल मदतीला

बदलापूर - वांगणी दरम्यान नदीचे पाणी रेल्वे रुळांवर आल्याने कर्जतकडे जाणारी वाहतूक रात्री उशिरापासून ठप्प आहे. परिसरात चार-पाच फूट पाणी साचलंय

Jul 27, 2019, 12:14 PM IST

बदलापूर - वांगणी स्टेशनदरम्यान जवळ  कासगावाजवळ 'महालक्ष्मी एक्सप्रेस' रात्रभर अडकून पडली आहे. या रेल्वेत जवळपास २००० प्रवासी असल्याचं समजतंय.

1/10

एनडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीनं आत्तापर्यंत ११७ महिला आणि लहान मुलांची सुखरुप सुटका करण्यात आलीय.

2/10

नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही घटनास्थळी उपस्थित झालीय. सोबतच नौदलाचं एक हेलिकॉप्टरही तैनात आहे. 

3/10

सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या साहाय्यानं रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येतंय. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांनाही हलवण्यात येईल.

4/10

पावसाचा जोर कायम असताना रेल्वेमध्ये पाणी शिरल्याची चिन्हं दिसत असल्यानं प्रवासी धास्तावले

5/10

प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही बदलापूरकडे रवाना झालीय. नौदलाचं एक हेलिकॉप्टरही मदतीला घटनास्थळी लवकरच दाखल होतंय

6/10

 दरम्यान, आरपीएफ अधिकारी आणि पोलीस नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

7/10

लवकरच मदत दाखल होत असून कुणीही घाबरून जाऊ नये - रेल्वे प्रशासन

8/10

रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा देत त्यांनी प्रवाशांसाठी बिस्कीट आणि पाण्याची सोय केली

9/10

रेल्वे ही सुरक्षित जागा आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खाली पाण्यात उतरु नये - रेल्वे प्रशासन

10/10

प्रवाशांनी एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या सूचना पाळा - रेल्वे प्रशासन