MahashivRatri 2024: प्रतिकाशी म्हणून ओळखली जाणारी कोकणातील प्राचीन शिवमंदिरं
भारताच्या उत्तरेला असलेलं काशी विश्वनाथ या तीर्थक्षेत्राला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. असं असलं तरी कोकणातील काही प्रचीन शिवमंदिरं हे महाराष्ट्रातील प्रतिकाशी म्हणून ओळखली जातात.
1/7
वेळणेश्वर शिवमंदिर
![वेळणेश्वर शिवमंदिर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713048-velneshwar.jpg)
अथांग समुद्राची येणारी गाज, लाल माती आणि सोबतच नारळी-पोफळीच्या बागांमधून डोकावणारं कौलारू वेळणेश्वराचं प्राचीन मंदिर मनाचा ठाव घेतं. तीन फुट लांबीची शिवपिंड त्यावर असलेला पाच फणांचा नाग अशी गाभाऱ्यातील शिवाची पिंड आहे. नवसाला पावायला वेळ न लावणारा देव म्हणजे ‘वेळणेश्वर’ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
2/7
कुणकेश्वर
![कुणकेश्वर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713046-kunkeshwar.jpg)
हापूस आंब्यासोबतच देवगडची आणखी ओळख सांगणारं तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर शिवमंदिर. गाभाऱ्यातील शिवलींग हे शिवलींग स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्यं म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर 21 शिवलिंगाचं दर्शन होतं. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पाच पांडवांनी देवगडच्या किनाऱ्यावर 21शिवलिंगाची स्थापना केली.अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या ठिकाणाला कोकणातील काशी म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी या गावात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.
3/7
व्याडेश्वर मंदिर
![व्याडेश्वर मंदिर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713045-wyadeshwar.jpg)
4/7
मार्लेश्वर
![मार्लेश्वर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713044-marleshwar.jpg)
रत्नागिरीच्या डोंगरावर वसलेला मारळ गावचा देव म्हणून मार्लेश्लर अशी येथील मंदिराची ओळख आहे. दिवेलागणीच्या वेळी मंदिर परिसरात लावण्यात येणाऱ्या दिपमाळांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होतं. पावसाळ्यातील मार्लेश्वर परिसरात असलेल्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मार्लेश्वराला भेट देतात.
5/7
धूतपापेश्वर
![धूतपापेश्वर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713043-dhutpapeshwar.jpg)
6/7
रामेश्वर मंदिर
![रामेश्वर मंदिर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713042-rameshwar.jpg)
7/7
हरीहरेश्वर
![हरीहरेश्वर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/01/713041-harihareshwar.jpg)