Mahatma Phule Thoughts : महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, जे संपूर्ण जीवनच बदलतील

 महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या देशातील महान समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. 

| Nov 28, 2023, 10:04 AM IST

ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्यांना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी जातीवादाच्या विरोधात अनेक चळवळी सुरू केल्या. शेतकरी, कनिष्ठ जाती आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी लढा दिला. समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. त्यांनी आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी अनेक चळवळी केल्या. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रकृती ढासळू लागली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्‍यात प्रदीर्घ आजाराने त्‍यांचे निधन झाले. भारतातील पहिले हिंदू अनाथाश्रम स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. जाणून घेऊया महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांचे अमूल्य विचार.

1/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

स्वार्थ वेगवेगळी रुपं धारण करतो  कधी जातीचा तर कधी धर्माचा  धर्म महत्त्वाचा नाही  माणुसकी असली पाहिजे 

2/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

स्वार्थ वेगवेगळी रुपं धारण करतो  कधी जातीचा तर कधी धर्माचा  धर्म महत्त्वाचा नाही  माणुसकी असली पाहिजे 

3/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

नवीन विचार तर दररोज येत असतात पण  त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे - महात्मा ज्योतिबा फुले 

4/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

विद्येविना मती गेली  मतीविना नीती गेली  नीतिवान गती गेली  गतीविना वित्त गेले  वित्ताविना शूद्र खचले  इतके अनर्थ एका अविद्येने केले

5/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे.

6/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

धर्म म्हणजे जो समाजाच्या हिताचा, समाजाच्या हिताचा आहे, जो धर्म समाजाच्या हिताचा नाही तो धर्म नाही.

7/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

जीवनाची गाडी केवळ दोन चाकांवर चालत नाही, त्याला वेग तेव्हाच मिळतो जेव्हा मजबूत दुवे जोडले जातात.

8/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

9/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात

10/10

महात्मा फुले यांचे विचार

Mahatma Jyotiba Phules Motivational quotes on his Death Anniversary

सर्व प्राण्यांमध्ये पुरुष सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. स्त्री आणि पुरुष जन्मतःच मुक्त आहेत, त्यामुळे दोघांनाही सर्व हक्क समानतेने उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.