महिंद्रा बोलेरो हायटेक फिचर्चसह होणार लॉन्च

महिंद्राची सर्वात लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही बोलेरो लवकरच नवीन हायटेक वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात येणार आहे

May 15, 2019, 15:27 PM IST

मुंबई : महिंद्राची सर्वात लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही बोलेरो लवकरच नवीन हायटेक वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात येणार आहे. नवीन बोलेरोमध्ये एबीएस (एंटी लॉक ब्रॅकिंग सिस्टम) देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, यात आणखी काही खास  वैशिष्ट्ये असतील. १ जुलैपासून नवीन सुरक्षा नियम लागू होणार आहेत, त्यानुसार कारमध्ये आवश्यक असलेल्या सुरक्षितता अटी अनिवार्य असतील.

1/5

नवीन बोलेरोमध्ये एबीएस शिवाय ड्रायवर साइड एअर बॅग, सीटबेल्ड रिमाइंडर, स्पीड वॉर्निंग सिस्टम आणि रीअर पार्किंग सेन्सरसारख्या सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील असतील.

2/5

१ एप्रिलपासून लागू होणार्या नवीन सुरक्षा नियमांनुसार एबीएस त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी, एसयूव्हीमध्ये दिलेली इतर सुरक्षा वैशिष्ट्ये १ जुलैपासून अनिवार्य होणार आहेत. 

3/5

याव्यतिरिक्त ऑक्टोबर २०१९ मध्ये या कारची विशेष चाचणी घेण्यात येणार आहे. कारला साइड आणि फ्रन्ट क्रॅश चाचणीमध्ये खरे उतरावे लागणार आहे. एप्रिल २०२० पासून बीएस ६ एमिशन नॉर्म्स लागू करण्यात येणार आहे. नवीन बोलेरो या दोन अपडेट्स सह लॉन्च करणायात येणार आहे. 

4/5

मागील आर्थिक वर्षामध्ये कंपनीने ७२ हजार २८० गाड्यांची विक्री केली होती. आर्थिक वर्ष २०१७-१८ वर्षाच्या तुलनेत मागील आर्थिक वर्षामध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून आले. २.२५ टक्क्यांनी गाड्यांच्या विक्रीचा आकडा खाली उतरला होता. 

5/5

महिंद्रा बोलेरो एक उत्तम प्रतिची कार आहे. महिंद्रा SUV अत्यंत कमी किमतीत मिळणारी कार आहे. त्याचप्रमाणे या कारचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत कमी खर्चात चालते. कारमध्ये जास्त जागा असल्यामुळे ती अनेक कामांसाठी वापरण्यात येते.