कोणी म्हणे देव, कोणी प्रेरणास्थान; खेळाडूंकडून सचिनला खास शुभेच्छा

Apr 24, 2020, 16:06 PM IST
1/9

कोणी म्हणे देव, कोणी प्रेरणास्थान; खेळाडूंकडून सचिनला खास शुभेच्छा

#HappyBirthdaySachin. क्रिकेटचा देव म्हणून, एका भारतीय क्रिकेटपटूकडे पाहिलं जातं. क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या, अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या, फलंदाची करायला आल्यावर विरोधी संघातील खेळाडू आणि मैदानात उपस्थित क्रिडीरसिकांपासून ते पंच आणि समालोचकांपर्यंत सर्वांचेच डोळे दीपवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतून आणि विशेष म्हणजे क्रीडा जगतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चला तर मग पाहूया, अनेकांच्या प्रेरणास्थानी असणाऱ्या या सचिनला नेमक्या कोणी आणि कशा शुभेच्छा दिल्या..... 

2/9

अजिंक्य रहाणे

मागील वर्षीच्या एका कसोटी सामन्यातील आठवणीचा संदर्भ देत अजिंक्य रहाणेने सचिनला शुभेच्छा दिल्या.   

3/9

धवल कुलकर्णी

हॅप्पी बर्थडे सर जी, म्हणत धवल कुलकर्णीने सचिनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या   

4/9

कृणाल पांड्या

क्रिकेटच्या देवाला शुभेच्छा देत सर्वांसाठीच एक प्रेरणास्त्रोत असल्याबद्दल त्याने सचिनचे आभारही मानले   

5/9

वीरेंद्र सेहवाग

सचिनच्या कारकिर्दीला दोन फोटोमध्ये मांडत वीरेंद्र सेहवागने त्याला शुभेच्छा दिल्या. सेहवागने पोस्ट केलेले हे फोटो तितकेच बोलके आहेत हे खरं.   

6/9

व्हीव्हीएस लक्ष्मण

तू तेव्हा आता आणि यापुढेही सर्वांचा प्रेरणास्त्रोत राहशील असं म्हणत व्हिव्हिएसने सचिनला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.   

7/9

इरफान पठाण

सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या स्ट्रेट ड्राईव्हचा उल्लेख करत आपण ती जादू पाहिल्याचा उल्लेख उरफान पठाण याने केला.   

8/9

विराट कोहली

एका अशा व्यक्तीला शुभेच्छा ज्याच्या या खेळाप्रतीच्या समर्पकतेने अनेकांनाच प्रोत्साहित केलं... या शब्दांत विराटने सचिनला शुभेच्छा दिल्या.   

9/9

किदम्बी श्रीकांत

फक्त क्रिकेटविश्वातूनच नव्हे तर इतरही खेळाडूंनी सचिनला शुभेच्छा दिल्या. त्यातीलच एक नाव म्हणजे किदम्बी श्रीकांत. प्रोत्साहन आणि अद्वितीय व्यक्तीमत्वाला समानार्थी शब्द असेल तर तो म्हणजे सचिन तेंडुलकर, असं म्हणत त्याने मास्टर ब्लास्टरला शुभेच्छा दिल्या. (सर्व छायाचित्रे- ट्टविटर)