खऱ्या आयुष्यात शनाया करतेय 'या' व्यक्तीला डेट

रसिकाच्या जीवनात आला खरा 'गॅरी'....

Jan 03, 2021, 15:47 PM IST

मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत रसिकाने साकारलेलं शनाया हे पात्र खूप चर्चेत आहे. शनाया हे पात्र नुकतच मालिकेतून संपलं आहे. मालिकेतील शनायाचं लग्न झालं आहे आणि ती अमेरिकेला गेली आहे.  आणि याच वेळी रसिका सुनील सध्या आपल्या खासगी जीवनात ही चर्चेत आहेत. 

1/6

रसिका सध्या एका मुलाला डेट करत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने ही बातमी शेअर केली आहे. 

2/6

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, "होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे."

3/6

‘दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अशी रसिकाने शुभेच्छा दिली आहे. पुढे ती म्हणते की, २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं.

4/6

दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती.

5/6

अमेरिकेतच आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.

6/6