अमिताभ बच्चन यांना आपला मुलगा मानत होते Mehmood Ali, पण बिग बीच्या एका चुकीने नातं तुटल, मेहमूदने आयुष्यभर...
हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडी किंग 60 च्या दशकाचा काळ खूप गाजवला होता. महमूद हे अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर' होते. पण बिग बीची एक चुकूनही हे नात तुटलं आणि आयुष्यभर त्यांनी अमिताभ यांना माफ केलं नाही.
नेहा चौधरी
| Jul 23, 2024, 14:29 PM IST
1/7

मेहमूद अली हे भारतातील प्रसिद्ध कॉमिक कलाकारांपैकी एक असून त्यांनी 60 दशक गाजवलं. ते आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. अभिनेत्याने 1961 मध्ये राजेंद्र कुमार यांच्या 'ससुराल' या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये फिल्मफेअरसोबतच्या संभाषणात महमूद अलीचा भाऊ अन्वर अली म्हणाला होता, 'ते आपल्या जीवनशैलीच्या बाबतीत राजासारखे जगले, पण ते मोठ्या मनाचेही होते. त्यांना कारची आवड होती आणि एकेकाळी इम्पाला, एमजी, जग्वार आणि इतरांसह 24 कार त्यांच्याकडे होत्या.
2/7

3/7

सलीम खान-जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटात मेहमूद अली यांनी अमिताभ यांना मुख्य भूमिका दिली. यानंतर त्यांना 1973 मध्ये रिलीज झालेला 'जंजीर' हा चित्रपट मिळाला, जो अमिताभ यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. 2004 मध्ये मेहमूद यांचं निधन झाले तेव्हा अमिताभ बच्चन यांनाही त्यांची आठवण झाली.
4/7

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय होतं की, 'एक अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मला नेहमीच मदत केली. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला महमूद मदतनीसांपैकी एक होते. 'बॉम्बे टू गोवा'मध्ये मला मुख्य भूमिका देणारे ते पहिले निर्माते होते. सलग अनेक फ्लॉप चित्रपटानंतर मी घरी परतण्याचा विचार केला तेव्हा मेहमूद साहबचा भाऊ अन्वरने मला थांबवलं.'
5/7

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, एका रेडिओ ब्रॉडकास्टरने महमूद अली यांना त्यांच्या घोड्यांबद्दल विचारलं तेव्हा ते अभिमानाने म्हटलं होतं, 'सर्वात वेगवान घोडा अमिताभ आहे. ज्या दिवशी त्याला गती मिळेल, तो सर्वांना मागे सोडेल. मात्र, त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये अमिताभ यांच्यासोबतच्या नातेसंबंधातील कटुता व्यक्त केली. मात्र नेहमी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशा व्यक्त केली की ते अधिक उंचीवर पोहोचतील.
6/7
