अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साधेपणाने जिंकल मन; आतापर्यंतच्या Budget मधील खास साडी लूक
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांचा सलग 7वा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा असताना निर्मला सीतारमण यांचा साधेपणा त्यांच्या साडीतून दिसून आला.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला त्यांच्या मंत्रालयातून बाहेर पडल्या तेव्हा राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह अर्थसंकल्प तयार करणारी टीमही त्यांच्यासोबत होती. निर्मला सीतारमण यांनी आज अर्थ मंत्रालयाबाहेर एका वेगळ्याच अंदाजात दिसल्या. प्रत्येक वेळेप्रमाणे तिच्या हातात लाल रंगाचा टॅब तर होताच, आज त्यांच्या पेहरावाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने क्रीम रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीला जांभळ्या रंगाची बॉर्डर आहे.
निर्मला सीतारमण कायमच भारतातील खादी कपड्याला प्रोत्साहन आणि प्राधान्य देतात. कायमच निर्मला सीतारमण खादी कपड्याचं कौतुक करताना दिसतात. तसेच निर्मला सीतारमण यांच्या साडीचं कलेक्शन कायमच चर्चेचा विषय असतो. या साड्यांमधून त्यांनी कायमच परंपरा आणि वैयक्तिक शैली दोन्ही प्रतिबिंबित केल्या आहेत.
प्रत्येक वर्षी, अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान निर्मला सीतारमण यांची साडी हा भारताच्या विविध प्रादेशिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारा एक खास आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी देखील त्यांची साडी चर्चेचा विषय आहे. यानिमित्ताने निर्मला सीतारमण यांच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील साड्या पाहणार आहोत.
निर्मला सीतारमण यांच साडी प्रेम

निर्मला सीतारामन यांची साड्यांबद्दलची ओढ सर्वश्रुत आहे. अर्थमंत्री आपला सातवा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री आहेत, ज्यांनी सहा विक्रमी मोरारजी देसाई यांना मागे टाकले आहे. निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी इतिहास रचत असताना, त्यांच्या अनेक वर्षांच्या विविध साड्यांवर एक नजर टाकली आहे.
2024-2025 अर्थसंकल्पातील साडी

निर्मला सीतारमण यांनी एक मोहक ऑफ-व्हाइट हॅन्डलूम साडी निवडली आहे. ज्यामध्ये चौकोनी नमुने आणि विस्तृत गुलाबी बॉर्डरसह मंत्रमुग्ध करणारे चेकर्ड खास वेगळेपण आहे. भारतीय कारागिरीचा उत्तम नमुना असलेला ही साडी सोनेरी बॉर्डरने सजलेली आहे. त्यांच्या साडीला हाफ स्लीव्हज असलेल्या जांभळ्या रंगाच्या ब्लाउजने छान कॉम्प्लिमेंट केले होते. भारतीय कापड कलात्मकतेचा वारसा आणि कौशल्य साजरा करण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.
मंगलगिरी सिल्क साडी

निर्मला सीतारामन यांची प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी साडी नेसण्याची निवड हा कायमच कौतुकाचा विषय ठरतो. भारतीय कापड आणि कारागिरीबाबत त्यांचे असलेले ज्ञान आणि प्रेम कायमच त्यांच्या कृतीतून दिसून येते. निर्मला सीतारमण यांनी पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी,त्यांनी रिबनने गुंडाळलेल्या राष्ट्रीय चिन्हासह लाल पॅकेटमध्ये पारंपारिक बही खातासाठी पारंपारिक ब्रीफकेस सोडली. तसेच अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या किनारी असलेली गुलाबी मंगलगिरी सिल्क साडी निवडली. ही साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती.
अर्थसंकल्प 2020

अर्थसंकल्प 2020 मध्ये, निर्मला सीतारामन यांनी प्रतीकात्मक विधान करण्यासाठी निळ्या बॉर्डरसह पिवळी रेशमी साडी नेसली होती. हिंदू संस्कृतीत पिवळा हा शुभ रंग मानला जातो. हे आशा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून, कोविड साथीच्या काळात, रंगाने आशावाद व्यक्त केला. निर्मला सीतारमण यांची तेव्हाची ही कृती चर्चेचा विषय ठरला.
अर्थसंकल्प 2021

अर्थसंकल्प 2022

अर्थसंकल्प 2023

अर्थसंकल्प 2024
