मासिक पाळीच्या त्रासाला नैसर्गिक पद्धतीने करा मॅनेज, 5 उपाय महत्त्वाचे
Menstrual Hygiene Day : पीरियड्स दरम्यान अनेक महिलांना खूप त्रास होतो. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळीच्या त्रासावर उपाय शोधू शकतो.
How To Manage Menstrual Health Naturally: दरवर्षी 28 मे रोजी 'मेंस्ट्रुअल हायजीन डे' साजरा केला जातो. या दरम्यान मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे असते. तसेच या दरम्यान नैसर्गिक पद्धतीने त्रास देखील कमी केला जातो. मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे.
युनीसेफच्या माहितीनुसार, जगभरात जवळपास 1.8 बिलियन महिलांना पीरियड्स येत असतात. यामधील 80 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासाला सामोरे जातात. तर 30 टक्के महिलांना सीवियर क्रॅम्प्स येतात. अनियमित मासिक पाळीचा चक्रामुळे 14 ते 25 टक्के महिलांना रिप्रोडक्टिव काळाज अनेक त्रासाला सामोरे जावे लागते.
पीरियड्स दरम्यान होणारा त्रास
![पीरियड्स दरम्यान होणारा त्रास Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745604-periodstoxicshocksyndrome.png)
मासिक पाळी आरोग्य कसे सांभाळावे
![मासिक पाळी आरोग्य कसे सांभाळावे Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745600-periods-1.png)
आयुर्वेदामध्ये, मासिक पाळी निरोगीपणा हा एकंदर आरोग्याचा महत्त्वाचा भाग मानला जातो. यामध्ये, मासिक पाळी ही एक नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया मानली जाते, ज्यामध्ये शरीरातील विष आणि घाण काढून टाकली जाते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. पूजा कोहली यांच्या मते, मासिक पाळीच्या क्रॅम्प्सचे आपण 5 प्रकारे नैसर्गिकरित्या सांभाळू शकतो.
फ्लूइडचा आहारात समावेश
![फ्लूइडचा आहारात समावेश Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745597-juicefood.png)
हर्बल चहा आणि कोमट पाण्याच्या रूपात भरपूर फ्लूइड प्यायल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होऊ शकते. हे आपल्या शरीरातील विष आणि कचरा काढून टाकण्यास फायदेशीर ठरते. अनेक महिलांना या दिवसांमध्ये ब्लोटिंगची समस्या जाणवते. अशावेळी कॅफीन, सोडा आणि अल्कोहोल सारखे उत्तेजक पेय टाळा. याव्यतिरिक्त, कोमट पाण्यात आल्याचा चहा किंवा जिरे टाकून प्यायल्याने सूज आणि पेटके कमी होण्यास मदत होते.
साधे-पौष्टिक पदार्थ खा
![साधे-पौष्टिक पदार्थ खा Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745594-vegetables.png)
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रोसेस फूड आणि तळलेले अन्न टाळा. कारण हे पदार्थ खाण्याचा जितका मोह होईल तितक्या जास्त समस्यांना तुमच्या मासिक पाळीत तोंड द्यावे लागेल. मासिक पाळी ही अशी वेळ असते जेव्हा गोष्टी साध्या ठेवाव्या लागतात. तुम्ही हलके, गरम आणि ताजे अन्न खावे. यामध्ये अनेक हंगामी भाज्यांचा समावेश आहे. कोणतीही पाककृती शिजवताना त्यात कमीत कमी मसाले घाला.
विश्रांती घ्या
![विश्रांती घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745623-periodslegcramp.png)
मासिक पाळी दरम्यान, महिलांचे शरीर गर्भाशयाचे अस्तर बाहेर काढण्यासाठी अधिक मेहनत करते, ज्यामुळे एखाद्याला थकवा सहन करावा लागतो. शरीराला पुरेशी झोप देणे हा त्याचा उद्देश आहे जेणेकरून शरीर बरे होऊन रिचार्ज होईल. दिवसभर अंथरुणावर पडून राहण्याचा कोणताही फायदा होत नाही, म्हणून काही शारीरिक हालचाल करत राहणे आवश्यक असते. ज्यामध्ये हलके चालणे, योगासने यांचा समावेश होतो. असे केल्याने दुखण्यापासून आराम मिळू शकतो आणि मूड देखील सुधारू शकतो.
स्वच्छता राखा
![स्वच्छता राखा Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745592-periodsmiss.png)
मासिक पाळी दरम्यान चांगली स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला दर 4-6 तासांनी आपले पॅड किंवा टॅम्पन बदलण्याची आवश्यकता आहे. तसेच, सुगंधी उत्पादने वापरणे टाळा कारण ते प्रभावित भागात चिडचिड करू शकतात. गरम आंघोळ करणे हा स्वच्छता राखण्याचा तसेच स्नायूंच्या क्रॅम्पपासून आराम मिळवण्याचा आणखी एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्यास फायदाच होतो.
आयुर्वेदिक औषध
![आयुर्वेदिक औषध Menstrual Hygiene Day](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/28/745590-ayurvedicplatelet.png)