ब्राव्हो... 'गिरिप्रेमी'च्या शिलेदारांनी अशी केली 'माऊंट कांचनजुंगा'वर यशस्वी चढाई!

पुण्याची 'गिरिप्रेमी'ची 'माऊंट कांचनजुंगा' मोहीम यशस्वी ठरलीय. कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारी देशातील पहिली आणि सर्वात मोठी नागरी मोहीम आहे. जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शिखर म्हणून कांचनजुंगा ओळखलं जातं

May 21, 2019, 11:23 AM IST

१५ मे रोजी पहाटे ५.३० वाजता गिरिप्रेमी संस्थेच्या १० शिलेदारांनी कांचजुंगा शिखरावर तिरंगा फडकावला

1/10

गिरिप्रेमीचे १० शिलेदार

गिरिप्रेमीचे १० शिलेदार

खडतर आव्हानांचा सामना करत, सतत बदलणाऱ्या हवामानाशी झुंजत आशिष माने, रुपेश आगिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखरावर यशस्वी चढाई केली. 

2/10

नेतृत्व - उमेश झिरपे

नेतृत्व - उमेश झिरपे

या मोहिमेचं नेृत्व उमेश झिरपे यांनी केलं. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली गिरिप्रेमीची ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. 

3/10

जगभरातील ३० गिर्यारोहक दाखल

जगभरातील ३० गिर्यारोहक दाखल

या मोहिमेदरम्यान झिरपे यांनी 'गिरिप्रेमी'च्याच नव्हे तर जगातील ३० जणांच्या जागतिक मोहिमेचं नेतृत्व केलं. गिरिप्रेमीच्या १० गिर्यारोहकांसोबत याच दरम्यान जगभरातील २० गिर्यारोहकही कांचनजुंगा शिखर चढाईसाठी दाखल झाले होते. त्यातील २१ गिर्यारोहक या शिखर सर करण्यात यशस्वी ठरले आहेत.  

4/10

गिरिप्रेमीचे सर्व गिर्यारोहक यशस्वी

गिरिप्रेमीचे सर्व गिर्यारोहक यशस्वी

एकाच टीममधील सर्व म्हणजे दहाही शिलेदारांनी कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वीरित्या करणं, हेदेखील गिर्यारोहणाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय, असं झिरपे यांनी म्हटलंय. 

5/10

जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर

जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर

नेपाळ - भारत सीमेवर सिक्कीम जवळ कांचनजुंगा शिखर उभं आहे. कांचनजुंगा शिखराची उंची ८५८६ मीटर अर्थात २८,१६९ फूट आहे. कांचनजुंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे.

6/10

बेस कॅम्प ते शिखरमाथा

बेस कॅम्प ते शिखरमाथा

पुण्याची ही टीम मार्च अखेरीस काठमांडूकडे रवाना झाली होती. सुरुवातीचं ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर ११ मे रोजी बेस कॅम्पवरून कांचनजंगाची चढाई सुरू केली. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कॅम्प ४ सोडला आणि बुधवारी १५ मे रोजी पहाटे साडे पाचच्या दरम्यान सगळ्यांनी शिखर सर केलं. 

7/10

ऑक्सिजन मास्कशिवाय चढाई

ऑक्सिजन मास्कशिवाय चढाई

उल्लेखनीय म्हणजे, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण विरळ झाल्यानंतरही उत्तम ट्रेनिंग घेतलेल्या 'गिरिप्रेमी'च्या गिर्यारोहकांनी कॅम्प ३ ते कॅम्प ४ ही चढाई सावकाश पण ऑक्सिजन मास्कशिवाय केली. कॅम्प ४ ते शिखरमाथा आणि पुन्हा कॅम्प ४ या मोठ्या प्रवासासाठी तब्बल २४ ते २६ तास लागू शकतात. 

8/10

देशातील ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम

देशातील ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम

१९७७ च्या यशस्वी ठरलेल्या लष्करी मोहिमेनंतरची ही देशातील ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम असल्याचं मानण्यात येत आहे. तसंच एवढ्या मोठ्या गिर्यारोहकांच्या संख्येने कांचनजुंगा शिखर सर करण्याची जगातील ही पहिलीच मोहीम ठरली आहे. 

9/10

अष्टहजारी शिखरमाथा

अष्टहजारी शिखरमाथा

जगातील ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेली एकूण १४ हिमशिखरे आहेत, त्यापैंकी एक  कांचनजुंगा हे शिखर आहे. यामुळे हे शिखर सर करणे हा एक बहुमान समजला जातो.

10/10

काठिण्याचं शिखर

काठिण्याचं शिखर

कांचनजुंगा शिखरावर चढाई करणं हे माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यापेक्षाही कठिण मानलं जातं. आजपर्यंत एव्हरेस्टवर ६००० च्या आसपास गिर्यारोहकांनी पाऊल ठेवलं आहे. परंतु, कांचनजुंगावर आत्तापर्यंत केवळ ३०० गिर्यारोहक चढाई करण्यात यशस्वी ठरले आहेत, हे विशे