सलमानसोबत पंगा घेऊन बनला स्टार, 100हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम, तुम्ही ओळखलं का?

सलमान खानसोबत पंगा घेऊन हा अभिनेता बनला स्टार. 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Soneshwar Patil | Feb 14, 2025, 13:41 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. ज्यामध्ये या अभिनेत्याने बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 

2/7

आम्ही तुम्हाला अभिनेते मोहनशी बहल यांच्याबद्दल बोलत आहोत. जे अभिनेत्री नूतन यांचा मुलगा आहे. त्यांनी 1983 मध्ये 'बेकरार' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

3/7

त्यानंतर  मोहनशी बहल यांनी सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट 'मैने प्यार किया' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. या चित्रपटाआधी त्याचे 6 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यावेळी ते अभिनय सोडून पायलट होण्याचा विचार करत होते. 

4/7

मात्र, त्यावेळी सलमान खानने त्यांची सूरज बडजात्याशी ओळख करून दिली. या चित्रपटातून त्याला नवीन ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी सलमानसोबत 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ हैं', 'कहीं प्यार ना हो जाये' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 

5/7

त्यानंतर त्यांनी अनेक मालिका केल्या. टीव्हीवरील त्यांच्या यशामुळे त्यांना चित्रपट निर्मात्यांनी संपर्क साधणे बंद केले. कारण त्यांना वाटले की त्यांना चित्रपटांसाठी वेळ काढू शकणार नाही. 

6/7

गेल्या 5 वर्षांपासून ते कोणत्याही चित्रपटात किंवा ओटीटी प्रोजेक्टमध्ये दिसले नाहीत. शेवटचा ते 'पानिपत' या चित्रपटात दिसले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते एका मजबूत मुख्य भूमिकेची वाट पाहत आहेत. 

7/7

सध्या ते त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता आणि व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. त्यांची लोणावळा आणि मुंब्रा येथे आलिशान मालमत्ता आहे. जिथे ते आपला वेळ घालवतात.