जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य!
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्य आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.
Mount Everest and Kailash Parvat:जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्य आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य!

चढाई करणे आव्हानात्मक

माउंट एव्हरेस्ट आणि कैलास पर्वताची उंची किती आहे?

हिमालयाच्या सर्वोच्च भागांपैकी एक

नेमकी अडचण काय?

कैलास पर्वताची उंची सुमारे 6,638 मीटर आहे, जी एव्हरेस्टपेक्षा कमी आहे. असे असले तरी तो सर करणे खूप कठीण आहे. भौगोलिक रचना, हवामान आणि कमाल उंचीमुळे गिर्यारोहकांसाठी ते मोठे आव्हान बनले आहे. कैलास पर्वतावर चढताना बऱ्याचदा हिमवर्षाव आणि जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. ज्यामुळे इथली परिस्थिती आणखी धोकादायक बनते. परिसराची नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि खडकांच्या निर्मितीमुळेही चढाई कठीण होते.
धार्मिक महत्त्व

कैलास पर्वताला मोठे धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात याला भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते. शिवाय, बौद्ध धर्मात त्याची 'कांता' म्हणून पूजा केली जाते. जैन धर्माचे अनुयायी देखील याला पवित्र स्थान मानतात. या भवतीच्या प्रवासाला 'कैलास परिक्रमा' म्हणतात. हा केवळ भक्तीचा भाग नाही तर आत्म्याच्या शुद्धीकरणाचे साधन आहे. धार्मिक श्रद्धेमुळे तो 'अविनाशी' पर्वत मानला जातो आणि म्हणूनच कोणीही त्यावर चढण्यास धजावत नाही.
अनेक आव्हाने

कैलास पर्वत न चढण्याची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मानसिक तयारी. गिर्यारोहण ही केवळ शारीरिक ताकदीची चाचणी नाही, तर तो मानसिक ताकदीचाही एक विशेष भाग आहे. कैलास पर्वतावर चढण्यासाठी व्यक्तीने केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसून त्याची मानसिक तयारीही केली पाहिजे. धार्मिक श्रद्धेमुळे, येथील प्रवासाला एक आध्यात्मिक पैलू देखील जोडलेले आहे, ज्याचा व्यक्तीवर मानसिक परिणाम होऊ शकतो.
याचे शास्त्रीय कारण काय?

अनेकांनी कैलास चढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कैलास पर्वत हे ब्रह्मांड आणि पृथ्वी यांच्यातील केंद्र मानले जाते. कैलास पर्वताचे वातावरण एव्हरेस्टच्या वातावरणापेक्षा कठीण मानले जाते. कैलास पर्वतावरील चुंबकीय क्षेत्र अधिक सक्रिय आहे. त्यामुळेच त्याचे वातावरण इतर ठिकाणच्या वातावरणापेक्षा वेगळे दिसते आणि त्यामुळे त्याची चढाई आणखी कठीण होते.
कैलास पर्वतावर आत्तापर्यंत कोण का चढू शकले नाही?
