भरपावसात मुंबईकरांवर पाणीसंकट! उद्यापासून 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय

गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

| Jun 30, 2023, 17:50 PM IST

Mumbai Water Cut: गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

1/7

भरपावसात मुंबईकरांवर पाणीसंकट! उद्यापासून 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

Mumbai Water Cut: गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

2/7

मुंबईकरांवर पाणीसंकट

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

असे असले तरी मुंबईकरांवरील पाणीसंकटाचे सावट अजूनही कायम आहे. त्यामुळे मुंबईत उद्यापासून पासून 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3/7

अपुरा पाणी पुरवठा

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

गेले काही दिवस सतत पाऊस पडत असला तरी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी तो पुरेसा नाही. जलाशयातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे  महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे. 

4/7

पाण्याचा काटकसरीने वापर

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

त्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

5/7

पावसाळ्यास बराच विलंब

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

यावर्षी पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्‍याबाबतचे अनुमान वर्तवण्‍यात आलेले आहे. 

6/7

जलाशयांमध्ये अपुरा पाणीसाठी

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार दिनांक 1 जुलै 2023 पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. 

7/7

सर्व ठिकाणी कपात

Mumbai reduce water supply 10 percent BMC Decesion

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.