नागपूर ते नाशिक अंतर 6 तासात पार होणार; असा आहे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा

समृद्धी महामार्गाच्या दुस-या टप्प्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाले. नागपूर ते नाशिक अंतर सहा तासांत पार होणार आहे. 

May 26, 2023, 23:57 PM IST

Nagpur Nashik Samruddhi Marg : समृद्धी महामार्गाच्या दुस-या टप्पा  खुला झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या दुस-या टप्प्याचं उदघाटन झाले. शिर्डी ते भरवीर असा हा दुसरा टप्पा आहे. 

1/8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या दुस-या टप्प्याचं उदघाटन झालं. शिर्डी ते भरवीर असा हा दुसरा टप्पा आहे.

2/8

यामुळे प्रवास सुपर फास्ट होणार आहे. 

3/8

एकूण 701 किमीच्या या महामार्गाचा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू झाला होता.

4/8

या टप्प्यात सिन्नरमधल्या गोंदे इंटरचेंज इथून नाशिक, अहमदनगर, पुणे आणि त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होणार आहे. 

5/8

त्यामध्ये तीन टोल नाक्यांचा समावेश आहे. 

6/8

 या मार्गामुळे नाशिक ते नागपूर अंतर सहा तासांत पार होणार आहे. 

7/8

 82 किलोमीटरच्या या रस्त्यावर तीन टोल असणार आहेत. 

8/8

शिर्डी ते भरवीर असा हा दुसरा टप्पा आहे.