National Tourism Day 2023: 'या' पर्यटन स्थळांना एकदा तरी भेट द्यावी; प्रत्येक भारतीयाच्या मनात असते ही इच्छा

भारतात अनेक पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहेत. मात्र, अशी काही पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांना भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात असते. राष्ट्रीय पर्यटन दिनामित्ताने  (National Tourism Day) या स्थळांचा घेतलेला आढावा. 

Jan 25, 2023, 20:19 PM IST

National Tourism Day 2023: 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day 2023) म्हणून साजरा केला जातो. भारत हा विविधतेने नैसिर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. जम्मू काश्मिर पासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत भारतातील वेगवेगळ्या प्रातांत अनेक पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहेत.  'या' पर्यटन स्थळांना एकदा तरी भेट द्यावी अशी इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात असते (tourist places in india). या पर्यटन स्थळांमुळे ताजमल, मुंबईतील गेट ऑफ इंडिया आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे. 

1/5

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू काश्मिर ओळखले जाते. येथील बर्फवृष्टी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्याने येथे भेट देतात. 

2/5

पंजाबमधील अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 'अमृत तलावा'च्या काठी हे मंदिर आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. 1830 मध्ये त्यावर जवळ जवळ 100 किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले. लाखो पर्यटक सुव्रण मंदिराला भेट देतात. 

3/5

भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर 'बीटिंग रिट्रीट' सोहळा नेहमीच सर्वांसाठी आकर्षणाचा विषय असतो. यावेळी दोन्ही देशाच्या जवानांनी थक्क करणाऱ्या चित्तथरारक कवायती केल्या जातात. 

4/5

गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे असेलेल्या गेट वे ऑफ इंडियाला हेरीटेज दर्जा आहे.  

5/5

ताजमहल हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. ताजमहल प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. देश विदेशातील पर्यटकही ताजमहलला भेट देत असतात.