चार महिन्याच्या लेकराला घेवून महिला आमदार अधिवेशनात; ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून डोळ्यात पाणी
‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) यांनी नाराजी व्यक्त केली.
Maharashtra Budget Session 2023-2024: शिंदे (Eknash Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) आजपासून सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेवून विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र, ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले.