दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही नेपोटिजम? फक्त 'ही' 6 कुटुंब चालवतायत संपूर्ण चित्रपटसृष्टी
South Film Industry Nepotism: बॉलिवूडवर (Bollywood) नेहमीच नेपोटिझमचा (Nepotism) आरोप करण्यात आला आहे. शाहरुख, अमिताभ, धर्मेंद्र, चंकी पांडे अशा अनेक अभिनेत्यांच्या मुलांना नेपोटिझमच्या टीकेला सामोरं जावं लागत असतं. अभिनेत्यांच्या मुलांना सहज संधी मिळत असताना दुसरीकडे अनेक गुणी कलाकरांना मात्र संघर्ष करावा लागत असल्याने नेपोटिझम हा विषय नेहमीच चर्चेत असतो.
1/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576998-ranbir-alia.jpg)
South Film Industry Nepotism: बॉलिवूडवर (Bollywood) नेहमीच नेपोटिझमचा (Nepotism) आरोप करण्यात आला आहे. शाहरुख, अमिताभ, धर्मेंद्र, चंकी पांडे अशा अनेक अभिनेत्यांच्या मुलांना नेपोटिझमच्या टीकेला सामोरं जावं लागत असतं. अभिनेत्यांच्या मुलांना सहज संधी मिळत असताना दुसरीकडे अनेक गुणी कलाकरांना मात्र संघर्ष करावा लागत असल्याने नेपोटिझम हा विषय नेहमीच चर्चेत असतो.
2/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576997-nepotism.jpg)
3/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576995-allu-arjun.jpg)
अल्लू कुटुंब - अल्लू अर्जून हे नाव आज संपूर्ण भारतभर ओळखलं जातं. दरम्यान अल्लू अर्जून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असणारी तिसरी पिढी आहे. अल्लू अर्जूनचे आजोबा अल्लू रामलिंगेया हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं आणि प्रसिद्ध नाव होतं. 1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दुसरीकडे अल्लू अर्जूनचे वडील अल्लू अरविंद हेदखील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. अल्लू अर्जूनसह त्याचा भाऊ अल्लू सिरीशही आता आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
4/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576994-ram-charan-chiranjeevi1.jpg)
चिरंजीवी कुटुंब - राम चरणचं स्टारडम सध्या प्रचंड असून आरआरआर चित्रपटामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. राम चरण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी आहे. राम चरणदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कुटुंबातून आहे. राम चरणची आई अल्लू सुरेखा या अल्लू रामलिंगेया यांची मुलगी आहे. म्हणजेच अल्लू अर्जून आणि राम चरण हे मावस भाऊ आहेत. चिरंजीवीशिवाय त्यांचे दोन्ही भाऊ कल्याण आणि नागेंद्र मोठे सुपरस्टार आहेत.
5/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576993-rajinikant.jpg)
रजनीकांत कुटुंब - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी रजनीकांत यांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. एकीकडे रजनीकांत आपल्या चित्रपटांसह चाहत्यांच्या मनावर राज्य करत असताना दुसरीकडे त्यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या दिग्दर्शन क्षेत्रात नाव कमावत आहेत. रजनीकांत यांचा जावई धनुषही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे.
6/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576992-rana-daggubati.jpg)
7/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576988-chiranjeevi.jpg)
अक्किनेनी कुटुंब अक्किनेनी कुटुंब हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या कुटुंबापैकी एक आहे. अक्किनेनी नागेश्वर राव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते होते. त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा नागार्जुन यानेही चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. आता नागार्जुन यांची मुलं नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी हेदेखील आपले पाय रोवत आहेत.
8/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576987-kamal-hasan.jpg)
9/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/14/576986-ram-charan-chiranjeevi.jpg)