फुकटात IPL मॅच पाहण्याचे दिवस संपले? IPL 2025 आधी अंबानींचा मोठा निर्णय; भरावे लागणार एवढे पैसे

IPL 2025 Jio Hotstar : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.  

Pooja Pawar | Feb 14, 2025, 14:07 PM IST
1/7

2023 मध्ये अंबानींच्या जिओ सिनेमाने आयपीएलच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स विकत घेतले. त्यामाध्यमातून मोबाईलवर आयपीएल सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत दाखवण्यात येत होते. मागील दोन वर्ष जिओ सिनेमावर क्रिकेट चाहते सब्स्क्रिप्शन न घेता मोबाईलवर फुकटात आयपीएल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू सक्त होते. मात्र आता आयपीएल 2025 मध्ये तसे होणार नाही आणि चाहत्यांना यासाठी पैसे मोजावे लागतील.   

2/7

Viacom18 आणि Star India यांचं विलीनीकरण झालं असून याद्वारे तयार झालेल्या नव्या कंपनीला JioStar असं नाव देण्यात आलंय. JioCinema आणि Disney+ Hotstar स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे विलीनीकरण JioStar बनल्यानंतर शुक्रवारी नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, JioHotstar लाँच करण्यात आले.

3/7

जवळपास 3 लाख तासांचे मनोरंजन, लाइव्ह स्पोर्ट्स कव्हरेज आणि 50 कोटींहून अधिक वापरकर्ते असलेले JioStar, प्रेक्षकांना एक चांगला अनुभव प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवत त्यांचे नवीन हायब्रीड सबस्क्रिप्शन मॉडेल जाहीर करत आहेत. 

4/7

Reuters ने दिलेल्या रिपोर्टनुसार क्रिकेट फॅन्स सुरुवातीची फक्त काही मिनिटं आयपीएल सामना सबस्क्रिप्शन शिवाय पाहू शकतील. मात्र त्यानंतर फ्री स्ट्रीमिंग सेशन बंद होईल आणि फॅन्स समोर सबस्क्रिप्शन पेज उघडेल. जिओ सिनेमाचं सबस्क्रिप्शन प्लॅन हा 149 रुपयांचा असल्याची माहिती मिळतेय. 

5/7

जिओ सिनेमाने 2023 पासून पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे डिजिटल राईट्स $3 billion रुपयांना विकत घेतले होते. 2023 पासून जिओ सिनेमाने मोबाईलवर फुकटात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केले. मात्र 2025 मध्ये चाहत्यांना संपूर्ण सामना पाहण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल. परंतु रिलायन्सने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

6/7

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन प्लॅन हा 149 रुपयांपासून पासून सुरु होईल, तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घेण्याकरता 499 रुपये प्रेक्षकांना मोजावे लागतील. 

7/7

आयपीएल 2025 मध्ये यंदा देखील 10 संघांचा सहभाग असणार आहे. गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. क्रिकबझला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मार्च पासून आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे.