तुमच्या लग्नात, बर्थ डे पार्टीत नोरा फातेहीचा डान्स हवाय? किती रुपये लागतील?

Nora Fatehi Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा आज 6 फेब्रुवारी रोजी 32 वा वाढदिवस आहे. नोरा ही भारतातील उत्तम डान्सर्सपैकी एक आहे. तिचे डान्सचे व्हिडीओ आणि तिची डान्स स्टाईल ही नेहमीच चर्चेत राहते. मात्र, तुम्हाला माहितीये का की नोरा काहीही कनेक्शन नसताना अनेक कार्यक्रमांमध्ये स्पॉट होते. त्याचं कारण म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावण्यासाठी तिला लाखो रुपये देण्यात येतात. चला तर जाणून घेऊया काही न माहित असलेल्या गोष्टी...

| Feb 06, 2024, 09:00 AM IST
1/7

नोरा फतेही

नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 मध्ये कॅनडामध्ये झाला होता. नोरा ही एक डान्सर, मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि प्रोड्युसर देखील आहे. 

2/7

बॉलिवूडमध्ये पदार्पण

कॅनडामध्ये मॉडेलिंग आणि डान्समध्ये करिअर केल्यानंतर नोरा भारतात आली. 2015 मध्ये आलेल्या रोर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

3/7

नोराची कार्यक्रमांची फी

2015 मध्ये नोरानं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं 40 मिनिटांसाठी 15 लाख घेतल्याचे म्हटले जात होते. 

4/7

गाण्यासाठी घेते इतके मानधन

नोरा फतेही एका आयटम सॉंगसाठी 40 लाख ते 1 कोटी मानधन घेते. याशिवाय ती एक ब्रँड्सची जाहिरात देखील करताना दिसते. 

5/7

सगळ्यात जास्त मानधन घेणारी डान्सर

भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या डान्सरमध्ये नोरा फतेही ही टॉपला आहे. त्याशिवाय ती सगळ्यात जास्त टॅक्स देणारी अभिनेत्री देखील आहे. 

6/7

मानधनात झाली वाढ

जशी-जशी नोराची लोकप्रियता वाढली तसं तिनं मानधनाची रक्कम वाढवली आहे. आता कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी ती 50 लाख ते 1 कोटी फी घेते, असं म्हटलं जातं. 

7/7

मुंबईत आहे इतक्या कोटींचं मानधन

नोराचं मुंबईतील वरळी परिसरात एक आलिशान घर असून त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. घरातील इतक वस्तूंची देखील कोट्यावधींची किंमत आहे. याशिवाय कॅनडामध्ये देखील आलिशान घर आहे. (All Photo Credit : Nora Fatehi Instagram)