Lucky Numerology 2025 : या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2025 लकी! बँक बॅलन्स वाढणार अन् कामातही मिळेल यश

Lucky Numerology 2025 : डिसेंबर महिना संपायला अवघ्ये 15 दिवस बाकी आहे. अशा लोकांना नवीन वर्षाचे वेध लागलेय. येणारं 2025 हे वर्ष कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, पाहूयात. 

| Dec 14, 2024, 17:12 PM IST
1/7

नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस असताना अंकशास्त्रानुसार नवीन वर्ष कसं असणार आहे, हे जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक आहेत. नवीन वर्ष काही जन्मतारखेच्या लोकांसाठी खूप लकी ठरणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.  

2/7

अंकशास्त्रानुसार 2025 मध्ये अंकांची बेरीज ही 9 होते. 9 अंकाचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे येणारं नवीन वर्ष 2025 वर मंगळ ग्रहाचा प्रभाव असणार आहे. 2025 हे वर्ष कोणत्या मूलांक लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे, पाहूयात.   

3/7

नवीन वर्ष 2025 हे ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे त्यांचा मूलांक 4 आहे. या लोकांसाठी 2025 वर्ष आनंदायी असणार आहे. त्यांच्यासाठी नवीन वर्ष शुभ संकेत घेऊन आलंय. 4 हा अंक राहु ग्रहाशी संबंधित आहे. राहू ग्रह क्रूर मानला जातो. त्यामुळे तुम्हाला थोडे फार कष्ट पडतील. पण तुम्ही नवीन वर्षात यशस्वी होणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन वर्ष लकी ठरणार आहे. व्यवसाय सुरु करायचा विचार असेल हे वर्ष उत्तम आहे. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कुटुंब आणि जोडीदारसह आनंददायी वेळ घालवणार आहात.   

4/7

ज्या लोकांचा जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे, ज्यांचा मूलांक हा 6 असतो. त्यांच्यासाठी नवीन वर्ष शुभ ठरणार आहे. 6 मूलांकचा स्वामी शुक्र आहे, शुक्र हा संपत्तीचा कारक आहे. त्यामुळे यांना आर्थिक फायदा होणार आहे. या लोकांना त्यांची ओळख बनवण्यासाठी अनेक संधी मिळणार आहे. सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही नवीन वर्षात घर किंवा कार खरेदी करु शकता. नातेसंबंधात चढ उतार येईल पण शेवटी सगळ काही चांगल होईल.   

5/7

ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 असतो त्यांचा मूलांक 8 असतो. यासाठी नवीन वर्ष या लोकांसाठी प्रगतीचा असणार आहे. 8 अंकाचा स्वामी शनि आहे. त्यामुळे या लोकांना शनिदेवाचा प्रभाव असणार आहे. या लोकांची अपूर्ण कामही नवीन वर्षात मार्गाला लागणार आहे. मात्र यासाठी त्यांना थोडी मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या कामाचे आणि मेहनतीचं फळ नवीन वर्षात मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थितीदेखील सुधारणार आहे.   

6/7

ज्या लोकांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झालाय त्यांचा मूलांक 9 असतो. या लोकांसाठी नवीन वर्ष शुभ असणार आहे. या मूलांकचा अधिपती मंगळ आहे, जो धैर्य आणि शक्तीचा कारक आहे. रखडलेली कामं नवीन वर्षात मार्गी लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. कुटुंबात आनंदाच आणि प्रसन्न वातावरण नवीन वर्षात राहणार आहे. तर बँक बॅलेन्सही वाढणार आहे.   

7/7

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)