World Cup 2023 Ticket Booking: वर्ल्ड कप तिकिटांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कसं खरेदी करणार?
World Cup 2023 Ticket Booking: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी आजपासून म्हणजे 15 ऑगस्टपासून तिकिटांचं रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. 5 ऑक्टोबरला स्पर्धा सुरु होणार असून 19 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टप्प्याटप्याने या स्पर्धेची तिकिटं विकत घेता येणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.
World Cup 2023 Ticket Booking: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी आजपासून म्हणजे 15 ऑगस्टपासून तिकिटांचं रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. 5 ऑक्टोबरला स्पर्धा सुरु होणार असून 19 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टप्प्याटप्याने या स्पर्धेची तिकिटं विकत घेता येणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628110-wc1.png)
एशिया कप 2023 स्पर्धेनंतर लगेचच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने नुकतंच स्पर्धेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल आणि 19 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628109-wc2.png)
नव्या वेळेनुसार आयसीसीने भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. याबरोबर आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांचीही घोषणा केली आहे. एकदिवसीय विश्वचषकाची तिकिटं मिळवण्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला तिकिटं मिळणार आहेत. रजिस्ट्रेशनला आजपासून म्हणजे 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628108-wc3.png)
क्रिकेट चाहत्यांना तिकिटांच्या रजिस्ट्रेशनसाटी आयसीसीच्या www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर जावं लागणार आहे. याशिवाय आयसीसीच्या अधिकृत पार्टनरच्या वेबसाईटवरही तिकिट बुकिंग करु शकता. रजिस्ट्रेशन करताना नाव, पत्ता, देस यासारखी प्राथमिक माहिती द्यावी लागणार आहे. रजिस्ट्रेशननंतर तिकिट मिळण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628107-wc4.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628106-wc5.png)
भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांची आणि सराव सामन्यांची तिकिटं 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहेत. अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत-पारिस्तान सामन्याचं तिकिट 3 सप्टेंबरला मिळणार आहे. तर सेमीफायनल आणि फायनलची तिकिटं 15 सप्टेंबरला विकत घेऊन घेऊ शकता. ओरिजनल तिकिटावर स्टेडिअममध्ये एन्ट्री दिली जाणार आहे. वर्ल्ड कप सामने होणाऱ्या शहरात तिकिट कलेक्शन काऊंटर उभारण्यात येणार आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628105-wc6.png)