Oral Health: निरोगी दातांसाठी आजच 'या' सवयी बंद करा...

Tips for Healthy Teeth: स्वच्छ, मजबूत आणि सुंदर दात प्रत्येकालाच हवे असतात. हसताना दिसणाऱ्या दातांमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. पण, या दातांची आपण किती काळजी घेतो हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. दातांची वेळेत काळजी नाही घेतली तर मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सवयी दातांसाठी हाणीकारक ठरतात.

Oct 20, 2022, 14:06 PM IST
1/5

कोल्ड्रिंग पिण्याची सवय अनेकांना असते. काही लोक तर थेट तोंडाने कोल्ड्रिंग पितात. यामुळे दातांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. कोल्ड्रिंग पिताना 'स्ट्रॉ' चा वापर करायला हवा, यामुळे थंडपणा दातांवर जास्त परिणाम करत नाही. 

2/5

दररोज दात घासण्याची सवय ही प्रत्येकालाच असते. दात निरोगी आणि स्वच्छ रहावेत म्हणून काहीजण जास्त जोर लावून दात स्वच्छ करतात. यामुळे तोंडामध्ये संक्रमण होऊ शकतं. कमी जोर लावून आणि गोल-गोल पद्धतीने दातांना स्वच्छ केल्याने दात निरोगी राहतात.

3/5

धूम्रपान केल्याने संपुर्ण शरीराचं निरोगी आरोग्य हे खराब होतं. पण, याचा दातांवर विशेष परिणाम होतो. धूम्रपान केल्याने दातांमध्ये प्लेग निर्माण होण्याची शक्यता वाढते. यामुळे दाढ खराब होऊ शकते.

4/5

बर्फाचं सेवन करताना त्याला थेट चावून खाऊ नये, यामुळे दात कमजोर होतात. यासोबतच, दातांची ,सेंसिटिविटीची समस्या निर्माण होते. तुम्हालाही बर्फ चावून खाण्याची सवय असेल तर आत्ताच बंद करा.

5/5

अनेकांना लहानपणीपासून नखांना चावण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच बंद करा. कारण, यामुळे तुमच्या दातांमध्ये फट निर्माण होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर, नखांमध्ये असणाऱ्या घाणीमुळे तोंडात जंतू जमा होण्याची शक्यता वाढते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)