कोरोना व्हायरसचे नवे साइड इफेक्ट; पाठीच्या कण्यात पसरतंय इंफेक्शन

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वैज्ञानिक देखील चिंतेत आहेत.  

Dec 31, 2020, 08:16 AM IST

2020च्या सुरूवातीला थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्यापही संपलेला नाही. जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वैज्ञानिक देखील चिंतेत आहेत. आता कोरोनाचे नवे साईड इफेक्ट देखील समोर आले आहे. याचेच संशोधन वैज्ञानिक करत आहेत.

1/5

पाठीच्या कण्यात पसरतंय इंफेक्शन

पाठीच्या कण्यात पसरतंय इंफेक्शन

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नुकताच  कोनोनाच्या विळख्यातून बाहेर निघालेल्या 6 वृद्धांच्या पाठीत त्रास होवू लागला. हा त्रास दिवसागणिक वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तपास सुरू केला. अखेर वृद्धांच्या पाठीच्या कणात इंफेक्शन झाल्याची बाब समोर आली.  

2/5

शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव

शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव

नानावती रुग्णालयातील स्पाईन सर्जन मिहिर बापट यांच्या म्हणण्यानुसार, '५ रुग्णांमध्ये या इंफेक्शनचं संक्रमण अधिक होते. ज्यामुळे रुग्णांच्या पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली. या व्यतिरिक्त त्यांना एँटीबायोटिक्स देखील देण्यात आले.' रुग्णांना आता पूर्णपणे बरं होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागेल असं देखील ते म्हणाले. 

3/5

3 महिने घ्यावी लागेल एँटीबायोटिक्स

3 महिने घ्यावी लागेल एँटीबायोटिक्स

मीडिया  रिपोर्टनुसार, एका 68 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर चार वेळा रुग्णालयात दाखल व्हाव लागलं. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्यानंतर त्यांना एँटीबायोटिक्स देण्यासाठी एक नर्स घरी येते. याचा दिवसाचा खर्च सात हजार रूपये आहे.

4/5

रुग्णालयात राहिल्यामुळे पसरतोय इंफेक्शन

रुग्णालयात राहिल्यामुळे पसरतोय इंफेक्शन

आयसीयूमध्ये राहिल्यामुळे पाठीच्या कण्यात इंफेक्शन पसरत असल्याचं सांगण्यात येत आहे. असं एका डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

5/5

कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे पसरतोय इंफेक्शन

कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे पसरतोय इंफेक्शन

कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे पाठीच्या कण्यात इंफेक्शन पसरत असल्याचं डॉक्टर बापट यांचं म्हणणं आहे.