रात्री किती वाजता झोपणं योग्य? वेळ उलटल्यानंतर कितीही झोपलात तरी नुकसान अटळ, आयुष्यही होईल कमी

Late Night Sleeping Side Effects in Marathi: आरोग्य तज्ज्ञांनुसार, अर्ध्या रात्रीनंतर झोपायची सवय स्ट्रेस वाढवतो आणि मेटाबॉलिजमसंबंधी समस्या वाढवते. इतकंच नाही तर डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर सारख्या मानसिक समस्या निर्माण करते.   

Feb 09, 2024, 11:01 AM IST

Late Night Sleeping Side Effects in Marathi: आरोग्य तज्ज्ञांनुसार, अर्ध्या रात्रीनंतर झोपायची सवय स्ट्रेस वाढवतो आणि मेटाबॉलिजमसंबंधी समस्या वाढवते. इतकंच नाही तर डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर सारख्या मानसिक समस्या निर्माण करते. 

 

1/9

शहरांमध्ये लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, अनेक लोक अर्ध्या रात्रीपर्यंत जागे असतात. काहींना तर रात्री 12 नंतरच झोप येते.   

2/9

आरोग्य तज्ज्ञांनुसार, अर्ध्या रात्रीनंतर झोपायची सवय स्ट्रेस वाढवतो आणि मेटाबॉलिजमसंबंधी समस्या वाढवते. इतकंच नाही तर डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर सारख्या मानसिक समस्या निर्माण करते.   

3/9

जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर नैसर्गिकरित्या दुरुस्ती करतं, ऊर्जा पुनर्संचयित करतं. उशिरा झोपल्याने ही प्रक्रिया प्रभावित होते.   

4/9

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा झोपणाऱ्यांचं आयुष्य लवकर झोपणाऱ्यांच्या तुलनेत कमी होतं.   

5/9

शरिरातील प्रक्रियेत अडचण

उशिरा झोपल्याने शरीरातील हार्मौनचा स्त्राव, मेटाबॉलिजम प्रभावित होतं आणि शरिराच्या तापमानातही बदल होतो.   

6/9

मानसिक आरोग्यावर प्रभाव

जर तुम्ही अर्ध्या रात्री झोपलात तर यामुळे फोकस टाइम कमी होतो. एकाग्रता कमी होते आणि स्मृतीही दुबळी होते.   

7/9

स्ट्रेस हार्मोनमध्ये वाढ

रात्री उशिरा झोपल्याने शरिरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल वाढतं. ज्यामुळे तणाव आणि वजनात वाढ होते.   

8/9

प्रतिकारशक्तीवर प्रभाव

अर्ध्या रात्री झोपल्यास आपण दर्जात्मक झोप घेत नाही, ज्याचा परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. आजार आणि संसर्गाची लगेच लागण होते.   

9/9

या सर्व समस्या टाळण्यासाठी आणि निरोग लाईफस्टाइलसाठी लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.