अभिज्ञा भावेच्या मेहंदी आणि ग्रहमख विधीचे फोटो

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Dakshata Thasale | Jan 06, 2021, 11:38 AM IST

मुंबई : २०२१ या नवीन वर्षात आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकत आहे. नुकताच अभिज्ञाचा मेहंदी आणि ग्रहमखचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमांचे फोटो अभिज्ञाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. अभिज्ञा भावे मेहुल पै सोबत विवाह बंधनात अडकत आहे. 

1/10

गेल्या काही दिवसांपूर्वीच ते रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. त्यानंतर अष्टमी दिवशी मेहुल सोबत अभिज्ञाचा साखरपुडा (Abhidnya Bhave Mehendi Ceremony) देखील झाला. 

2/10

हा कार्यक्रम तिने अगदी साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला आणि आता लवरकच अभिज्ञा लग्नबंधनात अडकणार आहे.

3/10

येत्या ७ जानेवारी रोजी अभिज्ञा आणि मेहुलचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

4/10

तिच्या या सेरेमनला रेश्मा शिंदे, श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, मयुरी देशमुख सह अनेकांनी हजेरी लावली होती.

5/10

मेहुल आणि अभिज्ञा गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

6/10

सध्या अभिज्ञा स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम करत आहे.

7/10

 नुकतीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली असून यात ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.

8/10

9/10

10/10