PM Modi Brunei Visit: बोईंग विमानं, 7000 कार्स, 2250 कोटींचा गोल्डन पॅलेस; अफाट श्रीमंत व्यक्तीची पंतप्रधान मोदी घेणार भेट
PM Modi Visit Sultan of Brunei: जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत असलेल्या ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्या देशात पंतप्रधान मोदी जाणार आहेत. मोदी आजपासून (3 सप्टेंबर) ब्रुनेईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
1/9
वयाच्या 21 व्या वर्षी 1967 मध्ये ब्रुनेईचे सिंहासनवर सुलतान हाजी हसनल बोलकिया विराजमान झालेत. 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या ब्रुनेईवर 600 वर्षांपासून बोलकिया कुटुंब राज्य करत आहे. सुलतान हाजी हसनल हे बोलकिया राजघराण्याचे 29 वे वारस आहेत. ते ब्रुनेईचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्रीसुद्धा आहेत.
2/9
3/9
4/9
ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांना गाड्यांची खूप आवड असून त्यांच्याकडे जवळपास 7000 कार आहेत. यामध्ये 600 Rolls Royce, 300 Ferraris, 134 Koenigseggs, 11 McLaren F1s, 6 Porsche 962 MS आणि अनेक Jaguar कारचा समावेश आहे. या गाड्या ठेवण्यासाठी त्यांच्या वाड्यात 110 गॅरेज बांधण्यात आले आहेत. ब्रुनेईच्या सुलतानच्या 200 घोड्यांसाठी एक वातानुकूलित स्टेबल देखील उपलब्ध आहेत.
5/9
ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांचा 2 दशलक्ष स्क्वेअर फूट पसरात राजवाडा पसरलेला आहे. जो 1984 मध्ये बांधला गेला होता. त्यांचा 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' हा जगातील सर्वात मोठा पॅलेस असून त्याचं नाव गिनीज बुकमध्येही नोंदवलं गेलं असल्याचा दावा करण्यात आलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुलतानच्या पॅलेसची किंमत 2250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
6/9
7/9
8/9
अहवालानुसार, ब्रुनेईच्या सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या मालकीच्या खाजगी जेटमध्येही सोनं आहे. ज्याची किंमत सुमारे 3359 कोटी रुपये आहे. विमानातील वॉश बेसिनदेखील सोन्याचं बनवलंय. जेटच्या आतील भिंती सोन्याने मढवल्या आहेत. एवढंच नाही तर जेटच्या फरशीवर सोनेरी तारे असलेले कार्पेटही टाकण्यात आलंय. या जेटमध्ये दिवाणखान्यापासून अनेक बेडरूमपर्यंत सर्व गोष्टींची व्यवस्था आहे आणि लक्झरी जीवनशैली आहे.
9/9