Post Officeच्या 'या' योजनांमध्ये पैसे गुंतवा, होईल मोठा फायदा

Post Office Schemes Interest Rates:तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला कोणत्या स्कीमवर व्याजाचा लाभ मिळत आहे.

Feb 18, 2023, 20:57 PM IST

Post Office Schemes Interest Rates:पोस्ट ऑफिस (Post Office) हा गुंतवणूकीसाठीचा मोठा पर्याय आहे. ज्या नागरीकांना मोठ्या रिस्क घ्यायच्या नसतील, त्यांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला कोणत्या स्कीमवर व्याजाचा लाभ मिळत आहे.

1/5

पोस्ट ऑफिस (Post Office) बचत खात्यावर ग्राहकांना 4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. यासोबतच पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ग्राहकांना 5.80 टक्के दराने व्याज मिळते.

2/5

पोस्ट ऑफिस (Post Office) टाईम डिपॉझिट योजनेत 7 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेत ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे.

3/5

पोस्ट ऑफिस (Post Office) ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ग्राहकांना 8 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाबद्दल बोलायचे झाले तर त्यावर 7.10 टक्के दराने व्याज मिळेल.

4/5

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 7 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर किसान विकास पत्रामध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.20 टक्के दराने व्याज मिळेल.

5/5

या सर्वांशिवाय जर आपण सरकारी योजना सुकन्या समृद्धी योजनेबद्दल बोललो तर ही योजना देशातील मुलींसाठी चालवली जात आहे, ज्यामध्ये 7.60 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याच वेळी, या योजनेत किमान शिल्लक 250 रुपये आहे.