प्रियांका, विराट इन्स्टाग्राम सेलिब्रेटींच्या यादीत जगात टॉप
इन्स्टाग्रामने जगात सर्वात जास्त चाहते असलेल्या सेलिब्रेटींची यादी जारी केली आहे.
मुंबई : सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आलं आहे. अगदी दूर देशात काय घडामोडी सुरु आहेत, हे देखील काही सेकंदात सोशल मीडियाच्या माध्यमातून समजंत. इन्टरनेट आता काळाची गरज झाली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वेच सोशल मीडियाचा वापर करतात. चाहत्यांना त्यांच्या आवडतीच्या कलाकारासोबत बोलणं सोशल मीडियामुळे सोपे झाले आहे. सेलिब्रेटींचे इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. कलाकार देखील त्यांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. इन्स्टाग्रामने जगात सर्वात जास्त चाहते असलेल्या सेलिब्रेटींची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा सुद्धा समावेश आहे.