अंबानी, अदानी किंवा टाटा नाहीत, 'हा' व्यक्ती आहे देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा मालक... किंमत कोट्यवधीत
Most Expensive Flat in India : भारतातील सर्वात महागडं घरं कोणतं असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळेल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा एंटेलिया बंगला. दक्षिण मुंबईतल्या अल्टामाऊंट रोडवर असलेल्या या अलिशान इमारतीची किंमत जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये इतकी आहे.
2/8
3/8
4/8
मुंबईत नुकतीच देशातील सर्वात महागडा फ्लॅट विकला गेला. याची किंमत तब्बल 369 कोटी रुपये इतकी आहे. दक्षिण मुंबईतल्या मलबार हिल्सवर हा सी-फेसिंग फ्लॅट आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सने हा अलिशान फ्लॅट तयार केला आहे. हा लोढा मालाबर सुपर लक्झरी रेसिडेंशियल अपार्टमेंट देशातील सर्वात महागडा फ्लॅट ठरला आहे
5/8
इतका महागडा फ्लॅट मुकेश अंबानी, गौतम अदानी किंवा रतन टाटा या बड्या उद्योगपतींपैकी कोणीतरी खरेदी केला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती जेपी तपाडिया यांनी देशातील हा सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केली आहे. तपाडिया कुटुंबाने लोढा मालाबर सुपर लक्झरी रेसिडेंशियल टॉवरमध्ये 26, 27 आणि 28 वा मजला खरेदी केला आहे.
6/8
1.08 एकरमध्ये पसरलेला या फ्लॅटची खासियत म्हणजे समोर दिसणार समुद्राचा नजारा. फ्लॅटच्या ड्रॉईंग रुम आणि बेडरुममधून अरबी सागरांच्या लाटांचा खूबसूरत नजारा पाहायाला मिळतो. या अलिशान फ्लॅटचं इंटेरिअर करोडो रुपयांमध्ये आहे. ट्रिप्लेक्स अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 27,160 वर्ग फूट इतका आहे. या टॉवरचं आर्किटेक्चर हाफीज कॉन्ट्रेक्टर यांनी तयार केलं आहे. तर इंटेरिअरचं काम 'स्टूडिओ एजबी'ने बनवलं आहे.
7/8
8/8