PHOTO : विनोद कांबळीची पहिली पत्नी घर चालवण्यासाठी काय करते? दुसरी पत्नी कोण होती?

Vinod Kambli Birthday : गेल्या काही महिन्यांपासून विनोद कांबळी त्याचा प्रकृतीमुळे चर्चेत आहे. विनोद कांबळीचा आज 18 जानेवारीला तो 52 व्या वाढदिवस साजरा करतोय. 

| Jan 18, 2025, 01:06 AM IST
1/7

विनोद कांबळीचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील कांजूरमार्गमधील इंदिरा नगर परिसरात झाला. विनोदचा कुटुंब अतिशय गरीब होतं. मात्र त्याच्या मेहनत आणि क्षमतेमुळे त्याने भारतीय संघात आपली जागा बनली. विनोद कांबळी नेहमीच चर्चेत असतो. खेळासोबत वैयक्तिक आयुष्यामुळे तो कायम चर्चेत राहिला. त्याने दोन लग्न केली आहेत. 

2/7

विनोद कांबळीचं पहिलं लग्न 1998 मध्ये नोएला लुईसशीसोबत पुण्यात झालं होतं. नोएला ही पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंड रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. विनोदने (Vinod Kambli Love Story) वयाच्या 26व्या वर्षी नोएलाशी लग्नगाठ बांधली. या लग्नासाठी विनोद कांबळीने धर्म बदला होता. विनोदची पहिली पत्नी ही ख्रिस्ती होती. 

3/7

पण हे लग्न फार काळ टिकले नाही. गॉसिप कॉलम्समध्ये विनोद कांबळी आणि नोएला लुईस यांच्या विभक्त होण्याचे कारण विनोदचे अति प्रमाणात मद्यपान असल्याच सांगण्यात आलंय. या दोघांनी घटस्फोट घेतला. 

4/7

घटस्फोटानंतर विनोद कांबळीची पहिली पत्नी घर चालवण्यासाठी काय करते, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर ती सध्या पुण्यात राहत असून केंद्र सरकारच्या जेल मंत्रालयाचे काम ती करते. बऱ्याच सार्वजनिक उपक्रमांमध्ये ती कार्यरत असते. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंटचेही ती काम करते.

5/7

विनोद कांबळीने दुसरं लग्न मॉडेल अँड्रिया हेविटशी केलं. कांबळी आणि हेविट यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव जोहाना क्रिस्टियानो आणि मुलाचं नाव जीसस क्रिस्टियानो कांबळी आहे. 

6/7

लग्न करण्यासाठी कांबळीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कांबळी आणि अँड्रियाने 2006 मध्ये कोर्ट मॅरेज केले होतं. पण 2014 मध्ये, कांबळीने अँड्रियाशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला, यावेळी भव्य लग्न करण्यात आलं. 

7/7

हे लग्न चर्चेत आलं कारण यावेळी त्याच्या एकुलत्या एक मुलगा या लग्नाला उपस्थितीत होता. आई वडिलांचं लग्न पाहून तो भारावला होता. दरम्यान विनोद कांबळीला बीसीसीआयकडून दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते.