श्वानानेही हेल्मेट घातलं... तुमचं कुठेय? पुणेकरांच्या जनजागृतीसाठी पोलिसांची अनोखी कल्पना

Pune : पुण्यात हेल्मेट न घालता मिरणवारी अनेक लोक तुम्ही पाहिली असतील. हेल्मेट सक्तीला मस्करी ठरवत अनेक जण ते घालत नाही. कधीतरी अपघात होतो मग हेल्मेटचं महत्त्व कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

Mar 30, 2023, 18:14 PM IST

Pune : पुण्यात हेल्मेट सक्ती असतानाही अनेक जण त्याचे पालन करताना दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही अनेक जण त्याला गंभीरपणे घेत नाही. अनेक जण आगाऊपणा करत हेल्मेट घालण्याला विरोध करतात. आता पुणे वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरु केली आहे. 

1/6

Helmet compulsory in Pune

पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती लागू असली मात्र तरीही पुणेकर या नियमाचं पालन करण्याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. याउलट हेल्मेट घालून गाडी चालवणं किती अवघड आहे हे पटवून देण्यात पुणेकर धन्यता मानतात.

2/6

punkar vs helmet

कितीही कठोर नियम केले तरीही पुणेकरांच्या पचनी ते पडताना दिसत नाही. त्यामुळेच पुण्यातल्या वाहतूक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे

3/6

spread awareness about wearing helmets

हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी श्वानालाही हेल्मेट घालून गाडीवर फिरवलं आहे 

4/6

pune police on social media

वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे आणि त्यांच्या गाडीवर हेल्मेट घालून ऐटीत बसलेल्या त्यांच्या पाळीव श्वानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5/6

Public awareness about wearing helmets

हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या वाहतूक पोलिसाने वापरलेला फंडा आकर्षणाचा विषय ठरला आहे. नागरिकांना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती सुरू केलीय. 

6/6

pune traffic police

हेल्मेट घाला, ते आपल्या सुरक्षेसाठी आहे. उद्यापासून नको आजपासूनच हेल्मेट घाला असा सल्लाही वाहतूक पोलिसाने दिला आहे.