डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाजीचा करा समावेश, फायदे वाचून थक्क व्हाल...
भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये या भाजीचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
Radish For Diabetes: थंडीच्या ऋतूमध्ये (Winter season) लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यातच भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये मुळ्याचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. या दोन्ही गोष्टी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर मुळा खाल्ल्याने (radish benefits) तुमच्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने अॅडिपोनेक्टिन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. हा हार्मोन इन्सुलिनच्या प्रतिकारापासून तुमचे संरक्षण करू शकतो.

मुळा ही व्हिटॅमिन सी (Vitamin C) च्या समृद्ध स्त्रोतांमध्ये गणली जाते. त्याचप्रमाणे दररोज खाल्ल्यास शरीराला फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मुळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यासोबतच कॅलरीजही नगण्य असतात. यामध्ये फायबर देखील असते, यामुळेच मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.



