लग्नाआधी परिणिती-राघव चढ्ढांनी सहकुटुंब एकत्र येत काय केलं पाहिलं का? हरभजनही होता हजर

Raghav Chadha Parineeti Chopra Family Photos: आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो चर्चेत असतानाच राघव चढ्ढांनी काही खास फोटो शेअर केले असून यामध्ये दोघांचेही अगदी वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. पाहूयात नेमके कशासंदर्भातील हे फोटो आहेत आणि ते शेअर करताना राघव चढ्ढा काय म्हणालेत...

| Oct 02, 2023, 12:37 PM IST
1/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांचे त्यांच्या कुटुंबियांबरोबरच लग्नाआधीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात हे फोटो आणि या फोटोंमगील गोष्ट जाणून घेऊयात...

2/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

25 सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा लग्न बंधनात अडकले. 

3/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्राचं लग्न राजस्थानमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलं.

4/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा लग्न सोहळ्यातील काही खास क्षण दोघांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. 

5/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

मात्र राघव चढ्ढा यांनी आता लग्नानंतर लग्नापूर्वी दोन्ही कुटुंब म्हणजेच चढ्ढा आणि चोप्रा कुटुंबियांचं गेट टू गेदर झालं होतं. याच कार्यक्रमातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

6/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांचे कुटुंबीय लग्नाआधी एकत्र वेळ घालवण्यासाठी भेटले होते.

7/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

या दोन्ही कुटुंबांनी या भेटीदरम्यान धम्माल केल्याचं राघव चढ्ढा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे.

8/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

विशेष म्हणजे या गेट टू गेदरला भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही उपस्थित होता.

9/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

राघव चढ्ढा हे एका फोटोत क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

10/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

इतर फोटोंमध्ये परिणिती आणि राघव चढ्ढा आपआपल्या संघांकडून एकमेकांविरोधात पॉइण्ट्स मिळवण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असल्याचं दिसत आहे.  

11/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

लग्नाआधी आम्ही आयोजित केलेल्या या गेट टू गेदरमध्ये आम्ही संगीत खुर्ची, चमचा लिंबू शर्यत, 3 पायांची शर्यत आणि क्रिकेट खेळलो, असं राघव चढ्ढांनी म्हटलं आहे.

12/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

आमच्या चढ्ढांच्या संघाला विजय मिळवता आला नाही. तरी आम्ही चोप्रा कुटुंबियांची मनं मात्र नक्की जिंकली, असं राघव चढ्ढांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

13/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

खास करुन आम्ही परिणितीचं मन जिंकण्यात यशस्वी ठरलो असून आता ती आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहे, असंही राघव यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

14/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

हरभजननेही राघव चढ्ढांनी पोस्ट केलेल्या या फोटोंवर कमेंट करुन मी चढ्ढांच्या टीममधून चोप्रांच्या टीममध्ये शिफ्ट झालो असं म्हटलं आहे.

15/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

तसेच हे खेळ खेळताना आमच्यापैकी काही जणांना छोट्या मोठ्या जखमा झाल्याचंही राघव यांनी 'या युद्धाच्या काही खूणा आमच्यापैकी काहींच्या अंगावर आहेत,' असं म्हटलं आहे.

16/16

raghav chadha parineeti chopra Pre wedding family meet funny photos

एकंदरितच हे फोटो पाहून राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्राच्या कुटुंबियांनी लग्नाआधी बरीच धम्माल केली असून खऱ्या अर्थाने सर्वांचं बॉण्डींग झालं असं दिसत आहे.